सोलापूर: ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले ( Global teacher Ranjit Singh Disley ) यांनी ग्लोबल पुरस्कारासाठी अर्ज करताना कोणत्याही अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही, जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे (डायट) नियुक्ती असतानाही तेथे गैरहजर राहिल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. या पार्श्वभूमीवर सुरवातीला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल. त्यानंतर गैरहजर काळातील जवळपास 34 महिन्यांचे वेतन वसूल केले जाईल. पण, तत्पूर्वी तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातील बाबींची पडताळणी होणार आहे, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या अहवालावरून महिनाभरात त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता ( Possibility of disciplinary action ) आहे, अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सुरू आहे.
रजेच्या अर्जावरून ग्लोबल टीचर समोर आले- जागतिक स्तरावरील ग्लोबल टीचर पुरस्कार ( Global Teacher Award ) मिळाल्यानंतर राज्यस्तरावर अनेकांनी डिसले गुरुजींचा सन्मान केला. पण, फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी अमेरिकेत जाण्यासाठी केलेल्या रजेच्या अर्जानंतर ग्लोबल टीचर आणि शिक्षणाधिकारी आमनेसामने आले.प्रोटोकॉल प्रमाणे रजेचा अर्ज देण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी यांनी डिसले गुरुजींना दिल्या. त्यानंतर डिसले गुरुजींनी ग्लोबल पुरस्कारासाठी नेमक्या कोणत्या बाबींची माहिती संबंधित संस्थेला दिली होती, त्याची पडताळणी झाली.
डिसले गुरुजींवर कारवाई अटळ मानली जात आहे- रणजित सिंह डिसले ( Ranjit Singh Disley ) यांनी पुरस्कारावेळी त्यांनी आपली शाळा आदिवासी भागात असून ती शाळा जनावरांच्या गोठ्यात भरते. विविध भाषेतील विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत असून त्यांच्यासाठी मी कन्नड भाषा शिकलो, त्या परिसरात बालविवाहाचे प्रमाण अधिक होते, पण माझ्या प्रयत्नातून शाळेतील मुलींची संख्या वाढली, बालविवाह थांबले, अशा बाबी पुरस्काराच्या अर्जात नमूद केल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर त्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी ग्लोबल टीचरवर कारवाईची मागणी झेडपीच्या सभागृहात केली. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने आता कारवाईची फाईल हातात घेतली असून आता डिसले गरुजींवर कारवाई अटळ मानली जात आहे.
महिनाभरात डीसले गुरुजीवर कारवाई होण्याची शक्यता- शिक्षण खात्याने शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत डिसले गुरुजीचीच्या कामाबाबत सखोल चौकशी केली आहे. तसेच हा चौकशी अहवाल शिक्षणाधिकारी यांकडे सादर केला आहे. शिक्षणाधिकारी यांनी हा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला. हा अहवाल वाचून जि. प. सीईओकडून डिसले गुरुजींवर कारवाई अटळ आहे. कारण चौकशी अहवालातील अनेक मुद्दे डिसले गुरुजीच्याविरोधात आहेत.
माफीनाम्यानंतर प्रशासन अन् ग्लोबल टीचरही गप्पचं- फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी ( Fulbright Scholarship leave ) काही महिन्यांची रजा द्या, अशी मागणी ग्लोबल टीचर डिसले यांनी प्राथमिक शिक्षण विभागाकडे दोन महिन्यापूर्वी केली होती. पण, अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासंबंधी कळवूनही त्यांनी काहीच केले नाही. तरीही, रजेचा अर्ज जाणीवपूर्वक पेंडिंग ठेवला. काहींनी माझ्याकडे पैशांची मागणी केली, असा आरोप डीसलेनी प्रशासनावरच केला. हा आरोप अंगलट येईल, याची जाणीव झाल्यानंतर ग्लोबल टीचर यांनी दोन पाऊल मागे येत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माफीनामा दिला. पण, माफीनामा दिला तरीही त्यांना आरोपांचा खुलासा करावाच लागेल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली. त्यानंतर डिसले गुरुजीही गप्प आणि प्रशासनही शांत झाल्याचे चित्र आहे.
हेही वाचा - सोलापुरात व्हायरल व्हिडिओतून हप्तेखोरीचा भांडाफोड, शहर गुन्हे शाखेवर हफ्ता वसुलीचे आरोप