ETV Bharat / city

सोलापुरातील शेकडो लीटर रासायनिक ताडी जप्त; पाच विक्रेत्यांवर अन्न औषध प्रशासनाची कारवाई - सोलापूर ताडी विक्रेत्यांवर कारवाई

सोलापूर शहरात रासायनिक ताडी विक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत बनावट रासायनिक ताडीचा साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी महिला पोलिसांना सोबत घेऊन ही कारवाई केली आहे.

सोलापुरातील शेकडो लीटर रासायनिक ताडी जप्त

author img

By

Published : Nov 19, 2020, 9:34 PM IST

Updated : Nov 19, 2020, 10:52 PM IST

सोलापूर - शहर आणि परिसरात रासायनिक ताडीची विक्री होत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन कार्यालय प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आज गुरुवारी अन्न प्रशासन विभागाच्या वतीने पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. या ठिकाणी रासायनिक पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. येथील ताडीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, तसेच रासायनिक विक्रीची पाच दुकाने सील करण्यात आली आहेत. यामध्ये पाच आरोपींवर कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

सोलापुरातील शेकडो लीटर रासायनिक ताडी जप्त
सोलापुरातील शेकडो लीटर रासायनिक ताडी जप्त

सोलापुरातील आकाशवाणी रोडवरील नीलम नगर येथील सत्यभामा सुभाष कोकडा यांच्याकडून 298 लीटर ताडी व तीन किलो क्लोराईडसाठा जप्त करण्यात आला आहे. रविवार पेठेतील जय हॉस्पिटलच्या मागे असलेल्या कौशल्य मारुती गुजराती यांच्याकडून 283 लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे. तर विडी घरकुल येथील गोल्डन ड्रिंक्स मालक राम कनकय्या भंडारी यांच्याकडून आठ किलो पांढरी रासायनिक पावडर जप्त करण्यात आली आहे. तसेच जोडभावी पेठ येथील विठ्ठल भंडारे यांच्याकडून तयार ताडीचे 567 पिशव्या आणि 283 लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे. रविवार पेठेतील वडार गल्ली येथील तिमक्का मंजुळे यांच्या घरातून ताडीचा नमुना सर्वेक्षणसाठी किंवा तपासणीसाठी घेण्यात आला आहे.

पाच विक्रेत्यांवर अन्न औषध प्रशासनाची कारवाई

महिला कॉन्स्टेबलला सोबत घेऊन कारवाई-

अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी महिला पोलिसांना सोबत घेऊन ही कारवाई केली आहे. कारण सोलापुरात बहुतेक ताडी दुकान चालक या महिला आहेत. कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर या महिला हल्ला करतात. या कारणास्तव या कारवाईत महिला पोलिसांची मदत घेण्यात आली.

ताडी प्राशन केलेल्या अनेकांचे मृत्यू;प्रशासनाला आत्ता जाग-

सोलापूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खुले आम ताडी विक्री केली जाते. विशेषतः पूर्व भागातील कामगार वर्ग याचे व्यसनी झाले आहेत. ही विषारी ताडी प्राशन केल्याने, अंगातील उर्जा कमी होती. तसेच नशेमुळे शरीरावरील नियंत्रण सुटते. तर ही रासायनिक ताडी लिव्हर आणि किडनी निकामी होण्यास कारणीभूत ठरत आहे.

शुद्ध ताडी किंवा नीरा सोलापूरमध्ये मिळतच नाही-

शुद्ध ताडी किंवा नीरा सोलापुरात मिळतच नाही. रासायनिक प्रक्रिया केलेली ताडी, शिंदी याची विक्री खुलेआम होते. दोनच दिवसांपूर्वी नवीन विडी घरकुल येथे पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी विषारी ताडी विक्रेत्यांवर कारवाई केली होती.

Last Updated : Nov 19, 2020, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.