सोलापूर- रॅपच्या जमान्यात हिंदी चित्रपट सृष्टीत आवाजाच्या दुनियेत अभिजात देणगी लाभलेल्या मोहम्मद रफी यांची आज 97 वी जयंती ( Mohammed Rafi Birth Anniversary ) आहे. मोहमद रफींच्या अनेक आठवणींना यानिमित्ताने उजाळा देण्यात येत ( Remembering Mohammed Rafi ) आहे. सोलापुरातील कलावंतानी रफीच्या गायकीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असल्याची माहिती सुहास सदाफुले ( Singer Suhas Sadafule ) यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना दिली. रफीसाब नसते तर आपण काय ऐकले असते? गायकीला पार्श्वगायनाची दिशा कोणी दिली असती? प्रेमात पडल्यावर, विरहात, आनंदात, दुःखात कोणाचा आवाज ऐकला असता, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे रफी साहेबांनी आपल्या गायनातून दिली ( Solapur Singer Remembering Mohammed Rafi ) आहेत.
सोलापुरातील कलावंत आणि गायक सुहास सदाफुले यांनी माहिती देताना सांगितले की, मव्वा या गाण्यापासून गायकीला सुरुवात केली. 1988 साली नववीत असताना हे गाणे पहिल्यांदा गायले. सुहास सदाफुले यांच्या आवाजाला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला. सोलापुरात 'व्हॉइस ऑफ रफी' म्हणून ( Voice Of Rafi Solapur ) नवीन ओळख मिळाली. लहानपणी वयाच्या 14 व्या वर्षांपासून सोलापुरातील विविध ठिकाणी सदाफुलेंच्या आवाजाची जादू सोलापूरकरांच्या मनामनात भिनली. रफींचे गाणे ऐकून रियाझ केला. पुढे ऑर्केस्ट्रा आणि गायकी पेशात त्यांनी हजारो गाणी गायली. कठोर परिश्रमाच्या जोरावर आपला प्रवास सुरूच ठेवला.
आपल्या गायनातून मोहम्मद रफी यांना श्रद्धांजली
24 डिसेंबर 1924 रोजी ब्रिटीश भारतातील कोटला सुल्तान सिंग (पंजाब प्रांत) येथे मोहम्मद रफींचा जन्म ( Mohammed Rafi Birthplace Kotla Sultan Singh ) झाला. भारतातील सर्वच भाषा मध्ये तब्बल 25 हजारपर्यंत गाणे गायलेल्या या गायकाला अनेक कलावंत आपल्या गाण्यांमधून श्रद्धांजली अर्पण करत आहेत. सोलापुरातील सुहास सदाफुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना खंत व्यक्त केली. मोहम्मद रफी यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट झाली नाही. पण त्यांना आपल्या गायकीतून श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्याच गाण्यांवर संसाराचा गाडा हाकत असल्याचे त्यांनी सांगितले.