ETV Bharat / city

Exam Fever 2022 - सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षेत दररोज दोन पेपर; ऑफलाईन परीक्षेवर विद्यापीठ प्रशासन ठाम - सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षेत दररोज दोन पेपर

सोलापूर विद्यापीठात फेब्रुवारी 2022 पासून विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिकविले जात आहे. सोलापुरातील सर्व कॉलेज सध्या ऑफलाइन सुरू आहेत. त्यामुळे परीक्षा ऑनलाइन नकोच, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. ऑनलाइनमुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाल्याने प्रत्येक पेपरसाठी मुलांना १५ मिनिटांचा वेळ वाढवून दिला जाणार आहे.

punyashlok ahilya devi holkar solapur university exams will be offline
सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षेत दररोज दोन पेपर
author img

By

Published : May 15, 2022, 2:58 PM IST

सोलापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन घेतल्या जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वी जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, १५ जून ते ३१ जुलैपर्यंत परीक्षा संपविण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. अंतिम नियोजनासाठी मंगळवारी १७ मे रोजी बोर्ड ऑफ एक्झामिनेशनची बैठक होणार आहे. सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षेत दररोज दोन पेपर घेणार असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे प्रमुख डॉ. गणपूर यांनी जाहीर केले आहे.

ऑफलाईन परिक्षेबाबत विद्यापीठ प्रशासन ठाम - कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सोलापूर विद्यापीठाच्या तीन परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सोलापुरातील सर्व व्यवहार सुरळीत झाले आहे. तरीदेखील परीक्षा ऑनलाइनच घ्याव्यात, अशी काही विद्यार्थ्यांची मागणी होती. मात्र, ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन परीक्षेतच विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध होते. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात बाहेर पडणाऱ्या मुलांना कोणतीही अडचण येणार नाही, यादृष्टीने विद्यापीठ प्रशासन आगामी सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे.

लिखाणासाठी परीक्षेत 15 मिनिटांचा वाढीव वेळ - सोलापूर विद्यापीठात फेब्रुवारी 2022 पासून विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिकविले जात आहे. सोलापुरातील सर्व कॉलेज सध्या ऑफलाइन सुरू आहेत. त्यामुळे परीक्षा ऑनलाइन नकोच, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. ऑनलाइनमुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाल्याने प्रत्येक पेपरसाठी मुलांना १५ मिनिटांचा वेळ वाढवून दिला जाणार आहे.

* सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षे बाबत महत्वाचे मुद्दे-

*सोलापुरातील फेब्रुवारीपासून सर्व कॉलेज ऑफलाइन, वसतिगृहेही खुली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा ऑफलाइन घेतली जाणार आहे.

*सोलापुरातील विद्यार्थ्यांची क्षमता सिद्धतेसाठी तोच पर्याय उत्तम

*विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी मिळणार १५ मिनिटांचा वाढीव वेळ

*सोलापूर विद्यापीठाच्या परिक्षेदरम्यान दररोज दोन पेपर होणार आहेत. पहिला पेपर ९ ते १२.३० तर , दुसरा पेपर १ ते ४.३० पर्यंत होईल

*१५ जून ते ३१ जुलै किंवा ५ ऑगस्टपर्यंत संपेल सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.