ETV Bharat / city

माढ्यातील माजी आमदार धनाजी साठे 'कमळ' सोडण्याच्या वाटेवर

भाजपमधील पक्षश्रेष्ठीकडून निर्णय प्रक्रियेत विचार केला जात नाही. सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने साठे पक्षावर कमालीचे नाराज झालेत.

धनाजी साठे
author img

By

Published : Apr 10, 2019, 9:01 PM IST

सोलापूर - माढ्यातील भाजपमध्ये असलेले माजी आमदार धनाजी साठे हे भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधूमाळीत निर्णय प्रक्रियेत घेतले जात नसल्याचा सूर साठे यांच्या कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

सध्या माढा लोसभा मतदार संघ हा चर्चेत आहे. भाजपमधील पक्षश्रेष्ठीकडून निर्णय प्रक्रियेत विचार केला जात नाही. सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने साठे पक्षावर कमालीचे नाराज झालेत. त्यातच कार्यकर्त्यांची त्यांनी माढ्यात बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्षावर नाराजीचा सूर दर्शवला.

त्यामुळे साठेंची भूमिका काय असणार याकडे मतदार संघाचे लक्ष वेधले गेले आहे. दोन दिवसात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे माजी आमादर धनाजी साठे यांनी सांगितले. माढा शहरासह तालुक्यात धनाजी साठे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाय साठे यांचे नातेवाईक माण-खटाव भागात देखील आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या साठे यांची मनधरणी करण्यात भाजप यशस्वी ठरणार की साठे दुसरी भूमिका घेणार याचाही या निवडणुकीवर परिणाम होणार आहे. विकासाला गती मिळेल अन् सामान्यांचे प्रश्न सुटतील या हेतूनेच काँग्रेसमधून भाजपत गेलो. मात्र आजच्या घडीला मी भाजपत आहे, काय असा प्रश्नच मला पडला आहे, असे माजी आमदार साठे यांनी सांगितले.

माजी आमदार धनाजी साठे

माढा नगर पंचायत साठेंच्या ताब्यात-

माजी आमदार धनाजी साठे यांच्या ताब्यात माढा नगरपंचायत असून संत कुर्मदास कारखाना तसेच विविध शैक्षणिक संस्था ते चालवत आहेत. कार्यकर्त्यांचे पसरलेले जाळे तसेच संस्थेमधील कर्मचाऱ्यांचे संख्याबळ लक्षात घेता माजी आमदार धनाजी साठे हे सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजपपासून दूर जाणे भाजपला अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.

माजी आमदार धनाजी साठे व राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मैत्रिचे नाते किती घट्ट होते, हे सर्वपरिचित आहे. विलासराव देशमुख यांच्यामुळे काँग्रेसमध्ये उभारी घेतलेले माजी आमदार साठे हे विलासराव यांच्या जाण्याने पक्षात बेचैन झाले होते. त्यातच 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमादर साठे यांचे पुत्र दादासाहेब साठे यांना तिकीट जाहीर करण्यात आले. मात्र ऐन वेळेस पक्षातील जिल्हा पातळीवरील नेते मंडळींकडून उमेदवारीसाठी पैश्यांची मागणी करण्यात आल्याची अॅडीओ क्लिपचा पूरावा देत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. दादासाहेब साठे यांनी माढ्याची निवडणूक ही भाजप पूरस्कृत म्हणून लढविली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपला अच्छे दिन आले, मात्र मात्र भाजपमध्ये पाच वर्ष येऊन देखील माजी आमदार साठे असोत की त्यांचा सामान्य कार्यकर्ता यांना पक्ष प्रवाहात सामील करुन घेतले नाही. सन्मानाची वागणूक ही देण्यात आलेली नाही. त्यामुळे साठे गट आता कोणते पाऊल टाकणार याची भूमकिा जाहीर करणार आहेत.

कोण आहेत माजी आमदार धनाजी साठे

सोलापूर जिल्हातील सहकार महर्षी दिवंगत गणपतराव साठे यांचे धनाजी हे पुत्र आहेत. माढ्यातील साठे घराणे पारंपरिक काँग्रेस पक्षात कार्यरत होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी धनाजी साठे यांची घनिष्ठ मैत्री होती. विलासरावांच्या मैत्रितूनच राजकीय क्षेत्रात त्यांनी भरारी घेतली. धनाजी साठे हे दोन वेळा आमदार होते. त्यांच्या पत्नी मंदाकिनी साठे या जिल्हा परिषद सदस्या होत्या. तर त्यांचे पुत्र सध्या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे आहेत. तर स्नूषा अॅड. मीनल साठे या माढ्याच्या नगराध्यक्षा तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आहेत.

'या'साठी नाराजी

शासनाच्या विविध समित्या गठीत करताना साठे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलले गेले. पक्षांच्या निर्णय प्रक्रियेत साठे गटास विश्वासात घेतले जात नाही. भाजपत सहभागी झालेल्या साठे गटाच्या ताब्यात असलेल्या माढा नगरपंचायतीस कायम स्वरूपी अधिकारी दिले नाहीत. तसेच साठे यांच्या ताब्यातील संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्यास सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळालेले नाही. जिल्ह्यात सहा साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई झाली. मात्र केवळ कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या साखर गोदामास सील ठोकले गेले. भाजपत असताना हे सगळे घडले. तर दूसरीकडे आता काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्यांना साखर कारखान्यांना मदत करण्याचे आश्वासन देऊन पक्षात प्रवेश दिला जातो. जो भाजपमध्ये आहे त्यांच्या साखर कारखान्यांना मदत नाही आणि बाहेरून येणाऱ्यांना मदत दिली जात असल्यामुळेही साठे नाराज झाले आहेत.

Intro:R_MH_SOL_02_10_EX_MLA_DHNAJI_SATHE_S_PAWAR
माढ्यातील माजी आमदार धनाजी साठे भाजपची साथ सोडण्याच्या वाटेवर
सोलापूर-
माढ्यातील भाजपमध्ये असलेले माजी आमदार धनाजी साठे हे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.
माढा लोकसभा निवडणूकीच्या रणधूमाळीत माढा मतदार संघातील कोणत्याही निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही तसेच भाजपाकडून सन्मानाची वागणूक दिली जात ऩसल्याचा सूर साठे यांच्या कार्यकर्त्यांमधून निघाला आहे. माढा लोकसभा मतदार संघातील भूमिकेच्या अनूषंगाने साठे यांच्या समर्थकांची माढ्यात बैठक पार पडली यावेळी हा सूर निघाला.
Body:सध्या माढा लोसभा मतदार संघ हा चर्चेत आहे. माढा लोकसभा निवडणुकींच्या रणधुमाळीत माढ्याचे माजी आ.धनाजी साठे हे भाजपा पक्षाला सोड चिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. भाजपातील पक्ष श्रेष्ठीकडुन निर्णय प्रक्रियेत विचार केला जात नाही तसेच सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने साठे पक्षावर कमालीचे नाराज झालेत.त्यातच कार्यकर्त्याची त्यांनी माढ्यात बैठक घेतली.या बैठकीत कार्यकर्त्यानी पक्षावर नाराजीचा सुर दर्शवला.
त्यामुळे साठे ची भूमिका काय असणार या कडे मतदार संघाचे लक्ष वेधले गेले आहे.दोन दिवसांत आपली राजकिय भुमिका स्पष्ट करणार असल्याचे माजी आ.धनाजी साठे यानी सांगितले. माढा शहरासह तालुक्यात साठे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.शिवाय साठे यांचे नातेवाईक माण खटाव भागात देखील आहेत.त्यामुळे नाराज झालेल्या साठे यांची मनधरणी करण्यात भाजपा यशस्वी ठरणार की साठे दुसरी भुमिका घेणार याचाही या निवडणूकीवर परिणाम होणार आहे. विकासाला गती मिळेल अन् सामान्याचे प्रश्न सुटतिल या हेतुनेच काँग्रेस मधुन भाजपात गेलो.मात्र आजच्या घडीला मी भाजपात आहे काय असा प्रश्नच मला पडला आहे असे माजी आ साठे यानी सांगितले.
माढा नगर पंचायत साठेंच्या ताब्यात-
माजी आमदार धनाजी साठे यांच्या ताब्यात माढा नगरपंचायत असुन श्री संत कुर्मदास कारखाना चालवित असुन विविध शैक्षणिक संस्था ते चालवत आहेत.कार्यकत्याचे पसरलेले जाळे तसेच संस्था मधील कर्मचारी याचे संख्याबळ लक्षात घेता माजी आमदार धनाजी साठे हे सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजपा पासून दुर जाणे भाजपा ला अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
माजी आ.धनाजी साठे व राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मैत्रिचे नातं किती घट्ट होते हे सर्वपरिचित आहे.विलासराव देशमुख यांच्या मुळे काँग्रेस मध्ये उभारी घेतलेले माजी आ.साठे हे विलासराव यांच्या जाण्याने पक्षात बेचैन झाले होते.त्यातच 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आ.साठे याचे पुत्र दादासाहेब साठे याना तिकिट जाहिर करण्यात आले.मात्र ऐन वेळेस पक्षातील जिल्हा पातळीवरील नेते मंडळींकडून उमेदवारी साठी पैश्यांची मागणी करण्यात आल्याची अॅडीओ क्लिपचा पूरावा देत कॉंग्रेस पक्ष सोडला आणि दादासाहेब साठे यांनी माढ्याची निवडणूक ही भाजप पूरस्कृत म्हणून लढविली आणि भाजपामध्ये प्रवेश केला.
भाजपाला अच्छे दिन आले मात्र मात्र भाजपा मध्ये पाच वर्ष येऊन देखील माजी आ.साठे असोत की त्यांचा सामान्य कार्यकर्ता याना पक्ष प्रवाहात सामील करुन घेतले नाही.सन्मानाची वागणूक ही देण्यात आलेली नाही.त्यामुळे साठे गट आता कोणते पाऊल टाकणार याची भूमकिा जाहीर करणार आहेत.

कोण आहेत माजी आ.धनाजी साठे-
सोलापुर जिल्हातील सहकार महर्षी कै गणपतराव साठे याचे धनाजी हे पुत्र आहेत.माढ्यातील साठे घराणे पारंपरिक काँग्रेस पक्षात कार्यरत होते, माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्याशी धनाजी साठे यांची घनिष्ठ मैत्री होती. विलासरावांच्या मैत्रितूनच राजकीय क्षेत्रात भरारी घेतली. धनाजी साठे हे दोन वेळा आमदार होते. त्यांच्या पत्नी मंदाकिनी साठे या जिल्हा परिषद सदस्या होत्या. तर त्याचे पुत्र सध्या भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे आहेत.तर स्नूषा अॅड.मीनल साठे या माढ्याच्या नगराध्यक्षा तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आहेत

या साठी नाराजी-
शासनाच्या विविध समित्या गठीत करताना साठे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलले गेले,पक्षांच्या निर्णय प्रक्रियेत साठे गटास विश्वासात घेतले जात नाही,भाजपात सहभागी झालेल्या साठे गटाच्या ताब्यात असलेल्या माढा नगरपंचायतीस कायम स्वरूपी अधिकारी दिले नाहीत, तसेच साठे यांच्या ताब्यातील संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्यास सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळालेले नाही.जिल्ह्यात सहा साखर कारखान्यावर आर आर सी ची कारवाई झाली मात्र केवळ कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या साखर गोदामास सील ठोकले गेले.. भाजपात असतांना हे सगळं घडले. तर दूसरीकडे आता कॉंग्रेस मध्ये असलेल्या नेत्यांना साखर कारखान्यांना मदत करण्याचे आश्वासन देऊन पक्षात प्रवेश दिला जातोय.जो भाजपात आहेत त्यांच्या साखर कारखान्यांना मदत नाही आणि बाहेरून येणाऱ्यांना मदत दिली जात असल्यामुळेही साठे हे नाराज झाले आहेत. Conclusion:नोट- सोबत व्हीडीओ आणि बाईट ची एक फाईल जोडली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.