सोलापूर - ऑक्टोबर महिन्यापासून ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. प्रत्येक साखर कारखान्यात तिपटीने गाळप सुरू आहे. सोलापुरातील 11 सहकारी व 17 खासगी साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम जाहीर केली आहे. जवळपास 2000 ते 2400 दरम्यान एफआरपी'ची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. हमीभावाचा विचार केला असता, एकमेव पीक म्हणजे ऊस आहे. मागील वर्षापेक्षा यंदा तिपटीने गाळप सुरू आहे. त्यामुळे देशात किंवा राज्यात ऊस गाळपामध्ये सोलापूर अव्वल येणाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
160 कोटी 60 हजार 294 मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट-
सोलापूर जिल्हयातील साखर आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज अखेर 59 लाख 90 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. मागील वर्षी दुष्काळामुळे पूर्ण हंगामात 63 लाख 36 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. यंदा मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने शासनाने 160 कोटी 60 हजार 294 मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2018-2019 यावर्षी 1 कोटी 61 लाख 28 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते.
14 दिवसात शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम देने बंधनकारक-
शासन नियमाने शेतकऱ्यांना कारखानदारांनी 14 दिवसात एफआरपी रक्कम देने बंधनकारक आहे. पण सोलापूर जिल्ह्यातील अनेक सहकारी कारखाने आणि खासगी कारखाने हे वर्षभर एफआरपी रक्कम देत नाही. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक होतात. ऊस आंदोलन करतात. सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार एकत्र येत एफआरपी रक्कम थकवतात. सरकार देखील शेतकऱ्यांना जवळ करण्याऐवजी कारखानदारांना जवळ करते.
साखर कारखान्याचे एफआरपी दर सर्वात अधिक आणि कमी-
सोलापूर जिल्ह्यातील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने 2431 रुपये दर जाहीर केला आहे. तर भैरवनाथ विहाळ या खासगी साखर कारखान्याने 1908 रुपये असा सर्वात कमी एफआरपी दर जाहीर केला आहे. तसेच सहकारी कारखानदारी क्षेत्रातील म्होरक्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2111 रुपये एफआरपी दर जाहीर केला आहे.
साखर कारखान्यांचे इथेनॉल उत्पादनावर भर-
केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिल्यामुळे ऊस गळपाचा वेग वाढविला आहे. हंगामाच्या पहिल्याच पंधरवड्यात तबल 179 लाख क्विंटल साखर तयार केली आहे. राज्यातील 161 साखर कारखान्यामध्ये उसाचे गाळप सुरू आहे. केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी दिली आहे. तत्पूर्वी मळीपासून इथेनॉल तयार केले जात होते. पेट्रोल आणि डिझेल यामध्ये इथेनॉल मिसळता येते. यामुळे कारखानदारांनी ऊस गाळप सोबत इथेनॉल उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे.
ऊस गाळप मध्ये सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम येण्याची शक्यता-
देशात सर्वात जास्त साखर कारखाने आणि ऊस लागवडी खालील क्षेत्र उत्तर प्रदेशात आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात आहेत. राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. यंदा ऊसाचे पीक मोठया प्रमाणात आल्याने, शेतकरी ऊस साखर कारखान्यात नेत आहेत. जिल्ह्यातील 28 साखर कारखान्यात तिपटीने ऊस गाळप सुरू आहे. यामुळे राज्यात किंवा देशात ऊस गाळपात सोलापूर अव्वल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतकरी आणि कारखानदारांमधील अंतर कमी होणे गरजेचे-
ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यामधील अंतर कमी होणे गरजेचे आहे. कारण एफआरपी रकमेवरून शेतकरी आणि कारखानदारांमधील अंतर वाढत गेले आहे. कारखानदारांनी जर 14 दिवसात एक रक्कमी एफआरपी दिल्यास हे अंतर कमी होईल.
हेही वाचा- पुण्यातील अॅमेझॉन कार्यालयाची मनसेकडून तोडफोड
हेही वाचा- 'शेतकरी संवाद अभियान' : नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा