ETV Bharat / city

कोट्यावधी रुपयांचे बनावट डिझेल विक्री, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक

अभियांत्रिकी महाविद्यालयातील द्वितीय वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यास सोलापूर शहर पोलिसांनी अटक केले आहे. तो विद्यार्थी सोलापुरातील ट्रॅव्हल्सवाल्यांना स्वस्त दरात टँकरद्वारे डिझेल विक्री करत होता. सुरुवातीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 1 कोटी 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर खोलात जाऊन तपास करत पोलिसांनी पालघर जिल्ह्यातुन आणखीन 16 कोटी 19 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस उपायुक्त
पोलिस उपायुक्त
author img

By

Published : Oct 19, 2021, 10:29 AM IST

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील द्वितीय वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यास सोलापूर शहर पोलिसांनी अटक केले आहे. तो विद्यार्थी सोलापुरातील ट्रॅव्हल्सवाल्यांना स्वस्त दरात टँकरद्वारे डिझेल विक्री करत होता. सुरुवातीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 1 कोटी 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर खोलात जाऊन तपास करत पोलिसांनी पालघर जिल्ह्यातुन आणखीन 16 कोटी 19 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एकूण 9 संशयित आरोपीना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून त्यांचा कसून तपास सुरू आहे, अशी माहिती उपायुक्त बापू बांगर यांनी माहिती दिली आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त

टँकरमधून डिझेल भरताना झाली कारवाई

गुन्हे शाखेच्या पोलिसांना एका खबऱ्याने माहिती दिली होती. सोलापुरात एक मोठा बनावट डिझेल आयात करणारा रॅकेट सक्रिय झाला आहे. सोलापूर शहर पोलीस त्यावर पाळत ठेवून होते. 14 ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास सोलापूर हैदराबाद महामार्गावर आकांक्षा ट्रॅव्हलच्या या खासगी वातानुकूलित बसमध्ये थेट टँकरद्वारे डिझेल भरत असताना संशयिताना पोलिसांनी पकडले. या कारवाईवेळी तानाजी कालिदास ताटे(वय 28,रा मानेगाव, बार्शी, सोलापूर), युवराज प्रकाश प्रबळकर (वय 25 रा, पंचशील नगर वैराग, ता बार्शी, सोलापूर), आकांक्षा ट्रॅव्हल्सचे मालक अविनाश सदाशिव गंजे(वय 46 वर्ष, रा. भवानी पेठ, सोलापूर), सुधाकर सदाशिव गंजे(वय 44 वर्ष, रा. अवंती नगर, सोलापूर), श्रीनिवास लक्ष्मण चव्हाण(वय 38 वर्ष, रा अभिषेक नगर, सोलापूर), हजू लतीफ शेख(वय 39 वर्ष, रा कोडगाव, उस्मानाबाद) यांना अटक करून तपास सुरू करण्यात आला. या संशयित आरोपींनी हिमांशु संजय भूमकर(वय 21 वर्ष, रा, वैराग, ता बार्शी, जि सोलापूर)याचे नाव सांगितले. 14 ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरात झालेल्या कारवाईत गुन्हे शाखेने 1 कोटी 1 लाख रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये टँकर, दोन वातानुकूलित बसेस, आणि बनावट डिझेल असा मुद्देमाल जप्त केला होता.

इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षणाचे धडे घेणारा हिमांशू भूमकर-

सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हिमांशू संजय भूमकर याला वैराग या गावातून ताब्यात घेतले आणि या डिझेल सदृश्य ज्वलनशील पदार्थांची माहिती घेण्यास सुरुवात केली. हिमांशू ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी कळाले की, हा तर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याची अधिक चौकशी त्याने सुरवातीला हे सर्व डिझेल कायदेशीररित्या विकत घेतले असल्याची माहिती दिली आणि काही पावत्या देखील सादर केल्या. पण पोलिसांनी सदर बिल घेऊन तपास केला असता खोटी बिल दिली असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटासारखं बोलू लागला. त्यानंतर खरी माहिती देत पालघर जिल्ह्यातील एका साई ओम पेट्रो स्पेशालिटी लिमिटेड या कंपनीकडून डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थ विकत घेतले असल्याची माहिती दिली आहे.

ओम साई पेट्रो स्पेशालिटीज लिमिटेडवर कारवाई

सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हिमांशू भूमकर याने दिलेल्या माहितीनुसार पालघर येथे जाऊन तपास केला.ही कंपनी फर्निश ऑइल बनवणारी कंपनी आहे, तर या कंपनीला डिझेल सदृश्य ज्वलनशील पदार्थ तयार करण्याचा परवाना आहे का हे तपासले पण तसा काहीही परवाना नसल्याचे समोर आले. सोलापूर शहर गुन्हे शाखेने ओम साई पेट्रो स्पेशालिटीज लिमिटेड कंपनीवर कारवाई करून 16 कोटी 19 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये मशिन, मोठ्या टाक्या, केमिकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या कंपनीच्या मालकाला आणि व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, त्यांना कोर्टात हजर करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पण त्यांची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

बनावट डिझेल विकणारी टोळी महाराष्ट्रात आहे का याचा तपास सुरू

सोलापुरात फक्त 65 रुपयांत एक लिटर डिझेल विकणारी टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. पण या टोळीचा विस्तार महाराष्ट्रात आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात आहे. याचा तपास सुरू असल्याची माहिती सोलापूर पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई करण्यात पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, एपीआय नंदकिशोर सोळुंखे, पीएसआय संदीप शिंदे, एपीआय सचिन बंडगर, श्रीनाथ महाडिक, अंकुश भोसले, संतोष फुटाणे,आदींनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.