ETV Bharat / city

Brother Murder Solapur पाचशे रुपयांची उधारी देण्यावरून भावाने काढला भावाचा काटा - दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिंजारवाडी

आईच्या श्राद्धात केलेल्या खर्चात एका मंगल भांडारचे पाचशे रुपये उधारी शिल्लक होती. यावरून उद्‌भवलेल्या वादातून मोठ्या भावाने छोट्या भावाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथील वळसंग पोलीस ठाण्याच्या Walsang Police Station Solapur हद्दीत घडली आहे. मोठ्या भावाने छोट्या भावास दगड व सळईने मारहाण elder brother beaten younger brother with stone and rod करून त्याला ठार केले. ही घटना 28 ऑगस्ट रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिंजारवाडी Pinjarwadi South Solapur येथे घडली आहे.

Brother Murder Solapur
पाचशे रुपयांची उधारी देण्यावरून भावाने काढला भावाचा काटा
author img

By

Published : Aug 30, 2022, 6:55 PM IST

सोलापूर आईच्या श्राद्धात केलेल्या खर्चात एका मंगल भांडारचे पाचशे रुपये उधारी शिल्लक होती. यावरून उद्‌भवलेल्या वादातून मोठ्या भावाने छोट्या भावाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथील वळसंग पोलीस ठाण्याच्या Walsang Police Station Solapur हद्दीत घडली आहे. मोठ्या भावाने छोट्या भावास दगड व सळईने मारहाण elder brother beaten younger brother with stone and rod करून त्याला ठार केले. ही घटना 28 ऑगस्ट रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिंजारवाडी Pinjarwadi South Solapur येथे घडली आहे. याबाबत अधिकृत माहिती सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले Assistant Police Inspector Atul Bhosale यांनी दिली. brother killed brother in solapur

सोलापूर येथील वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले माध्यमांना ह्त्याकांड प्रकरणाची माहिती देताना

पोलिसांनी चौघांना अटक केली 30 ऑगस्ट रोजी वळसंग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.सैफन घूडूसाब नदाफ(वय 41 ,रा पिंजारवाडी,दक्षिण सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.शहनाझ नदाफ यांनी याबाबत वळसंग पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.पोलिसांनी मीरालाल घुडूसाब नदाफ,सलीम मीरालाल नदाफ,रफिक मीरालाल नदाफ,नियामतबी मीरालाल नदाफ यांना अटक केले आहे. आईचे श्राद्ध करण्यासाठी केलेल्या खर्चावरून फक्त पाचशे रुपयांसाठी मोठ्या भावाने छोट्या भावाचा खून केल्यामुळे सोलापुरात हळहळ व्यक होत आहे.

दोनच महिन्यांपूर्वी आईचे श्राद्ध झाले होते एक वर्षांपूर्वी मीरालाल व सैफन यांच्या आईचे निधन झाले होते.या दोघां भावांनी एकत्रितरित्या आईचे श्राद्ध करून गोरगरिबांना अन्नदान केले होते. यावेळी गावातील एका मशिदीत असलेल्या मंगल भांडारमधून भांडे भाड्याने घेतले होती. या मंगल भांडारचे पाचशे रुपये उधारी शिल्लक राहिली होती. ही उधारी मागण्यासाठी मशिदीचे विश्वस्त जमादार हे 28 ऑगस्ट रोजी राहत्या घरी सकाळी सैफन नदाफ यांच्या घरी गेले होते. पण ही रक्कम मीरालाल नदाफ यांच्या कडून घ्या असे सैफन नदाफ यांनी सांगितले होते.

छोटा भाऊ शेतात एकटा दिसला आणि मारहाण केली पाचशे रुपयांवरून मीरालाल नदाफ हा छोटा भाऊ सैफन नदाफ यावर चिडून होता.सैफन नदाफ हा 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी शेतातील मोटार चालू करण्यासाठी गेला होता.त्यावेळी सैफन हा एकटा असल्याची संधी साधून मीरालाल नदाफ यांनी पाच शे रुपयांसाठी कर्जदारांना माझ्या घरी पाठवतो का असा जाब विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली.यावेळी मीरालाल यांचा मुलगा रफिक नदाफ याने पाठीमागून येऊन सैफन नदाफ यांचे हातपाय पकडले,मीरालाल नदाफ यांनी दगडाने,सळईने छोटा भाऊ सैफन नदाफ यांच्या डोक्यावर जबर मारहाण केली.मीरालाल नदाफ यांची पत्नी,नियामतबी नदाफ,दुसरा मुलगा सलीम नदाफ यांनी सैफन नदाफ यांच्या डोक्यावर व सर्वांगास जबर मारहाण केली.

अखेर सैफन नदाफ यांचा उपचारादरम्यान मृत्यू
शहनाज नदाफ यांनी उपचारासाठी पती सैफन यांस सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.पण डोक्याला गंभीर इजा झाल्याने जखमी उपचारास प्रतिसाद देत नव्हता.अखेर 30 ऑगस्ट रोजी दुपारी सैफन यांची प्राणज्योत मालवली.मृत झाल्याची माहिती मिळताच पिंजारवाडी येथील ग्रामस्थांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी केली होती.फक्त पाचशे रुपयांसाठी भावाने भावाला संपविले अशी चर्चा करत ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत होते.

हेही वाचा Maharashtra Crime NCRB Report 2021 महाराष्ट्रातील गुन्हेगारीचा आढावा; मुंबई अव्वल स्थानी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.