ETV Bharat / city

दोन लाख व पाच तोळे सोन्यासाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल - domestic violence in solapur

विवाहित महिलांवर सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. सदर बजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 लाख व 5 तोळे सोन्यासाठी विवाहित महिलेचा छळ झाला असून अखेर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दोन लाख व पाच तोळे सोन्यासाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल
दोन लाख व पाच तोळे सोन्यासाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखलदोन लाख व पाच तोळे सोन्यासाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल
author img

By

Published : Aug 14, 2020, 8:07 AM IST

सोलापूर - विवाहित महिलांवर सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. सदर बजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 लाख व 5 तोळे सोन्यासाठी विवाहित महिलेचा छळ झाला असून अखेर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

धनश्री स्वप्नील गुडुर(वय 21) या विवाहितेने सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पती स्वप्नील नागेश गुडुर, सासू गीता नागेश गुडुर, सासरे नागेश गुडुर यांविरोधात भादंवि 498-अ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

धनश्रीचा विवाह 29 नोव्हेंबर 2017 रोजी स्वप्नील गुडुर यासोबत झाला होता. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर धनश्रीला सासरच्या लोकांनी पैशाचा तगादा लावला. माहेरुन 2 लाख रुपये आणि 5 तोळे सोने घेऊन ये, अशी मागणी पती, सासू व सासरे यांनी करायला सुरुवात केली. सतत मानसिक व शारीरिक त्रास देत ही मागणी देखील वाढली. कमीतकमी दीड लाख तरी घेऊन ये, असा तगादा लावण्यात आला.

शेवटी विवाहित धनश्रीच्या वडिलांनी सप्टेंबर 2018 साली जावई स्वप्नील गुडुर यास 50 हजार रुपये व एक तोळे सोने दिले. तरी आरोपींनी धनश्रीला नांदवण्याचे सोडले. तसेच 6 एप्रिल 2020 रोजी मारहाण करून घरातून हाकलून दिले. सततच्या त्रासाला कंटाळून विवाहित धनश्रीने पती, सासू व सासरे यांच्या विरुद्ध 12 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे करत आहेत.

घरगुती हिंसाचार वाढला -

जोडभावी पोलीस ठाण्यात एका विवाहित महिलेचा पैशांसाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.