ETV Bharat / city

Ambedkar jayanti 2022 - आंबेडकर जयंतीला डीजेला परवानगी नाही; सोलापूर पोलीस आयुक्तांबरोबरची बैठक फिस्कटली - डीजे परवानगी सोलापूर आयुक्त बैठक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ( Ambedkar jayanti 2022 ) लिहिली, घटनेवर आधारित जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे. त्याच राज्यघटनेवर चालणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे, असे सांगत कायद्याने बंदी असलेल्या डीजेला परवानगी ( Ambedkar jayanti solapur dj demand ) नाही, अशा सूचना पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत आंबेडकरी बांधवाना सांगितल्या.

Ambedkar jayanti solapur dj demand
डीजे परवानगी सोलापूर आयुक्त बैठक
author img

By

Published : Apr 13, 2022, 11:37 AM IST

सोलापूर - भारताची राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ( Ambedkar jayanti 2022 ) लिहिली, घटनेवर आधारित जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे. त्याच राज्यघटनेवर चालणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे, असे सांगत कायद्याने बंदी असलेल्या डीजेला ( Ambedkar jayanti solapur dj demand ) परवानगी नाही, अशा सूचना पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत आंबेडकरी बांधवाना सांगितल्या. यावर आंबेडकरी बांधव, सामाजिक कार्यकर्ते, व पदाधिकारी आक्रमक पवित्रा घेत पोलीस आयुक्त कार्यालयातून निघून गेले.

माहिती देताना पोलीस आयुक्त आणि आंबेडकरी नेते

हेही वाचा - Raj Thackeray : सोलापुरातील मुस्लिम मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यास दिला पाठिंबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Ambedkar jayanti solapur ) यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी ही सूचना दिली.

सोलापूर शहरात 14 एप्रिलपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव सुरू होतो. दहा दिवस जयंती उत्सव आहे. यानंतर मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणुकीअगोदर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी या बैठकीत बोलताना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या सूचनांचे पालन करा, असा आदेश दिला. यावर उपस्थित असलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दोन बेस आणि दोन टॉपची मागणी केली, यावरून वाद वाढत गेला. पोलिसांनी स्पष्टपणे सुनावले की, न्यायालयाचा आदर केला पाहिजे, अन्यथा गुन्हे दाखल होतील. यावरून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पोलिंसांविरोधात घोषणाबाजी केली व बैठकीतून निघून गेले.

बैठकीला महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडकर, पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली घाटे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. बैठकीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती विश्वस्त समिती व उत्सव समितीचे अध्यक्ष अजित गायकवाड, राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, राहुल सरवदे, नगरसेवक प्रवीण निकाळजे, सुभान बनसोडे, अशोक जानराव, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, केरू जाधव आदी दलित व आंबेडकरी बांधव उपस्थित होते.

डीजेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - दलित बांधव, जयंती मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी ताबडतोब सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावली. या बैठकीत असा निर्णय घेतला आहे की, 15 एप्रिल रोजी मोठा जनमोर्चा काढून मागणी केली जाणार आहे. तसेच, 13 एप्रिल रोजी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

हेही वाचा - Solapur Ram Navami : सोलापुरात राम नवमीनिमित्त शिवसेनेची भव्य शोभायात्रा.. मुस्लिम, दलित बांधवांचाही सहभाग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.