ETV Bharat / city

Symbolic Siddheshwar Mahayatra : कोरोनामुळे सिद्धेश्वर महायात्रेवर अनेक निर्बंध; भाविकांनी घरातच थाटली प्रतिकात्मक सिद्धेश्वर महायात्रा - सिद्धेश्वर महायात्रा पूजा विधी

गेल्या दोन वर्षांपासून ही सिद्धेश्वर महायात्रा रद्द केली जात आहे. यंदादेखील काही प्रमुख धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर यात्रेचा समारोप ( Siddheshwar Mahayatra Solapur news ) करण्यात आला. जे धार्मिक विधी आणि महायात्रा पहावयास मिळाली नाही, त्याचे सर्व विधी आणि दर्शन प्रतिकात्मक महायात्रेतून करण्यात आले ( Symbolic Siddheshwar yatra at home in Solapur ) आहेत.

सिद्धेश्वर महायात्रेवर अनेक निर्बंध
सिद्धेश्वर महायात्रेवर अनेक निर्बंध
author img

By

Published : Jan 17, 2022, 5:26 PM IST

सोलापूर- नऊशे वर्षाची परंपरा असलेल्या सिद्धेश्वर महायात्रेवर कोरोनामुळे अनेक निर्बंध लादण्यात ( Restrictions on Siddheshwar Mahayatra ) आले आहेत. अशा परिस्थितीत सोलापुरातील सिद्धेश्वर भक्त आणि भाविकांनी एकत्र येऊन घरातच प्रतिकात्मक सिद्धेश्वर महायात्रा ( Symbolic Siddheshwar yatra at home in Solapur ) सजविली. याला भक्त आणि भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविक सिद्धेश्वर महायात्रेत दाखल होतात. यात्रेतील अक्षता सोहळा हा प्रमुख धार्मिक विधी आहे. या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने भाविक सोलापुरात येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ही सिद्धेश्वर महायात्रा रद्द केली जात आहे. यंदादेखील काही प्रमुख धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर यात्रेचा समारोप ( Siddheshwar Mahayatra Solapur news ) करण्यात आला. जे धार्मिक विधी आणि महायात्रा पहावयास मिळाली नाही, त्याचे सर्व विधी आणि दर्शन प्रतिकात्मक महायात्रेतून करण्यात आले ( Symbolic Siddheshwar yatra at home in Solapur ) आहेत.

भाविकांनी घरातच थाटली प्रतिकात्मक सिद्धेश्वर महायात्रा

हेही वाचा- Fake Playboy Job : प्लेबॉय म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून दीड लाखांची फसवणूक; आरोपीला दिल्लीतून अटक

घरबसल्या सिद्धेश्वर भक्ती-
घरबसल्या भक्तांना सिद्धेश्वर भक्ती करता यावी, यासाठी घरबसल्या सिद्धेश्वर भक्ती ही संकल्पना जेऊरे परिवाराला सुचली. यासाठी परिवारातील महाविद्यालयीन तरुणी पौर्णिमा जेऊरे यांनी प्रतिकात्मक सिद्धेश्वर महायात्रा ( Siddheshwar swami and worship at home ) साकारली. यासाठी तिने महायात्रेतील सर्व धार्मिक विधी प्रतिकात्मकरित्या साकारले. यामुळे सोलापुरातील भक्तांना घरबसल्या सिद्धेश्वर भक्ती करता येत आहे. शहरातील अनेक भाविक व भक्त दर्शनासाठी जेऊरे यांच्या घरी येत आहेत.

हेही वाचा- परवानगी शिवाय नंदीध्वजाची पूजा, सिद्धेश्वर मंदिरात असंतोष

संपूर्ण सिद्धेश्वर महायात्रा घरातच साकारली-
जेऊरे परिवाराने शहरातील राहत्या घरी संपूर्ण महायात्रा ( Siddheshwar swami and worship at home ) साकारली आहे. यामध्ये ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचे अध्यात्मिक व धार्मिक कार्य, सिद्धरामेश्वरांचे विचार, सामाजिक कार्य, सिद्धेश्वर महायात्रेतील धार्मिक विधी, गड्डा यात्रा अशी संपूर्ण सिद्धेश्वर महायात्रा साकारली होती.

हेही वाचा- Punjab Assembly Election 2022 : पंजाब विधानसभा निवडणूक आता 20 फेब्रुवारीला होणार

यात्रेचा समारोप झाला असला तरी मनामनात सिद्धेश्वर महायात्रा-
बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरात फक्त मोजक्या भाविक व मानकऱ्याच्या उपस्थितीत कप्पडकळी (नंदीध्वज वस्त्र विसर्जन) सोहळ्याने सिद्धेश्वर महायात्रेचा समारोप झाला. मंदिरात प्रदिक्षणेनंतर प्रसाद वाटप झाले. यात्रेचा समारोप झाला. सिद्धेश्वर महायात्रेचा समारोप झाला असला तरी सिद्धेश्वर भक्तांच्या घराघरात आणि मनामनात यात्रा आपले स्थान टिकवून आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.