सोलापूर- राज्याचे माजी गृहमंत्री वसुली प्रकरणात कारागृहात बंद होतो, हे अतिशय लाजिरवाणे आहे. हे राज्य सरकार तर वसुलीचे सरकार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ते अक्कलकोटमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज सोलापूर दौरा होता. त्यांनी अक्कलकोट येथे राज्य सरकारवर सडकून टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की भारतीय जनता पार्टी हे पक्ष मुंबईच्या मातीतून उभे राहिले आहे. या पक्षाला गाडून टाकणाऱ्याची भाषा करणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
हेही वाचा-फडणवीसांना त्यांचे मुख्यमंत्रीपद कसे गेले हेच कळलेले नाही, सामना अग्रलेखातून विरोधी पक्षाचा समाचार
स्वामींच्या दर्शनाची इच्छा पुर्ण झाली -
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की मी श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त आहे. स्वामी कृपेनेच जीवनात आरोग्य, स्थैर्य व समाधान आहे. त्यामुळे अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा मानस होता. ती इच्छा आज पुर्ण झाली आहे.
हेही वाचा-'जलयुक्त शिवार'ला क्लीनचिट नाही, देवेंद्र फडणवीस यांच्या अ़डचणी वाढणार
स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समाधान व्यक्त
अक्कलकोट दौऱ्यावर आले असता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी फडणवीस यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून सत्कार केला. स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. मंदिरात होत असलेल्या विविध विकासाभिमुख कामे पाहून व मंदिर समितीचे उपक्रम जाणून घेऊन विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा-मलिकांनी लवंगी फटाका लावला; आता बॉम्ब मी फोडेल - देवेंद्र फडणवीस
अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीच्या विरोधात ईडीची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विशेष कोर्टाने EDची कोठडी नाकारल्यानंतर अनिल देशमुख यांना ऑर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले होते. त्याविराेधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.