सोलापूर : केंद्रातील मोदी सरकार सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दर वाढवत असून, त्यामुळे सर्वच वस्तूंचे भाव प्रचंड वाढले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपकडून देशामध्ये मंदिर-मस्जिद आणि भोंग्याचे राजकारण सुरू झाले ( Temple Masjid Loudspeaker Politics By BJP ) आहे. म्हणून झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने शहर अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे लाईन येथील नवल पेट्रोल पंप ( Petrol Pump In Solapur ) येथे भोंगा लावून महागाईचा पाढा वाचण्यात आली. मोदी सरकारचा, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध व्यक्त करून इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी ( Solapur Congress Agitation ) केली.
जोरदार घोषणाबाजी : यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने भाषण ( Narendra Modi Old Speech ) तसेच महंगाई डायन हे गीत ऐकवण्यात येऊन मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे पेट्रोलपंप परिसर दणाणून गेला होता.
देशभरात मंदिर- मस्जिद आणि भोंग्याचे राजकारण : केंद्रातील मोदी सरकारने महागाई विरोधात मतं मागून सत्ता मिळवली. या आठ वर्षाच्या कार्यकाळात ६५ रुपयांचे पेट्रोल १२५, ५५ रुपयांचे डिझेल १०० रुपये, 350 रुपयांचे गॅस सिलेंडर ९७० रुपये अशी प्रचंड दरवाढ केली. गॅस सिलेंडरची सबसिडीही बंद केली. या दीड दोन महिन्यात तब्बल १५ वेळा पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढवून जनतेची लूट सुरु आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक महाग झाली आहे. त्यामुळे खाद्यतेलासह सर्वच वस्तूंची भाववाढ झाली आहे. नागरिकांना, महिलांना घर चालविणे अवघड झाले आहे. या प्रचंड महागाईमुळे रोजगारावर सुद्धा परिणाम झाला आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला महागाईवर नियंत्रण मिळविता आली नाही. देशभरात मंदिर- मस्जिद आणि भोंग्याचे राजकारण केले जात आहे. बहिऱ्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी भोंगा लावून त्यावर महागाईचा पाढा वाचण्यात आला.
युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित : या आंदोलनात युवक कॉंग्रेस चिटणीस प्रवीण जाधव, शहर वाहिद बिजापुरे, महेश लोंढे, राजासाब शेख, तिरुपती परकीपंडला, विवेक कन्ना, सुशीलकुमार म्हेत्रे, संजय गायकवाड, बाबुराव क्षीरसागर, सोहेल पठाण, शरद गुमठे, विवेक इंगळे, यासिन शेख, प्रतीक शिंगे, सुनील सारंगी, रोहन साठे, दिनेश डोंगरे, धीरज खंदारे, वैभव माने, गणेश वाघमारे, कृष्णा नाईक, अजय जाधव, रवी नाईक, अनिकेत भिसे, अन्वर फणीमल, प्रथमेश मुकणे, यांच्यासह इतर पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा : CNG Price Hike: पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या किंमतीत वाढ, पुणेकरांना 2 रुपयाचा फटका