ETV Bharat / city

कोरोनामुक्त झालेल्यांची सक्तीने रक्ताची तपासणी करणार - पालकमंत्री भरणे - solapur Mucormycosis

सोलापुरात आजतागायत 216 जणांना म्यूकरमायकोसिसची लागण झाली आहे.13 जणांचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे.

Guardian Minister Datta bharane
पालकमंत्री भरणे
author img

By

Published : May 28, 2021, 8:04 PM IST

Updated : May 28, 2021, 8:26 PM IST

सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूचे थैमान कमी होत आहे. परंतु म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने तोंड वर काढले आहे. याची लागण झालेल्यांपैकी काही रुग्णांचे डोळे निकामी झाले आहेत, तर काही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोलापुरात आजतागायत 216 जणांना म्यूकरमायकोसिसची लागण झाली आहे.13 जणांचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. चाळीसहुन अधिक जणांना कायमचा डोळा गमवावा लागला आहे. पण हा काळा बुरशी जन्य आजार कोरोना आजारातून बरे झालेल्यांना अधिक होत आहे. त्यामुळे कोरोना आजारातून बरे होणाऱ्याची सक्तीने रक्ताची तपासणी केली जाणार आहे. जेणेकरून त्यांना म्यूकरमायकोसिसची लागण होणार नाही किंवा त्यांवर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात रक्त तपासणी मोहीम तीव्र करणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्ता भरणे यांनी दिली.

माहिती देताना पालकमंत्री दत्ता भरणे

शुक्रवारी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांचा सोलापूर दौरा होता. या दौऱ्यावर असताना त्यांनी सोलापुरातील नियोजन भवन येथे सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत कोरोना महामारीवर आढावा बैठक घेतली.

हेही वाचा - 'आई-बाबा बाय..' अशी चिठ्ठी लिहून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

31 मे ते 5 जून दरम्यान जिल्हाभरात रक्ताची तपासणी केली जाणार-

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्यस्थितीत 9 हजार 592 पॉजीटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.आणि शहरात 591 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तसेच उपचार घेऊन घरी गेलेल्यांची संख्या देखील मोठी आहे. यांना म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका अधिक आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्याना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. त्यामुळे कोरोना आजारातून बरे झालेल्याची 31 मे ते 5 जून या कालावधीत रक्ताची तपासणी केली जाणार आहे. अशी माहिती पालकमंत्री दत्ता भरणे यांनी सोलापूर दौऱ्यावेळी दिली.

सोलापूरचा डेथ रेट 2.5 टक्के-

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढले. आणि मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढत गेली. सोलापूर जिल्ह्याचा डेथ रेट हा 2.5टक्के इतका आहे. पॉजीटिव्हविटी रेट हा 10.59 टक्के आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा 93.5 टक्के आहे.

हेही वाचा - घरांच्या किमती प्रति चौरस फूट 250 रुपये दराने वाढणार? बिल्डर संघटनेने 'ही' केली मागणी

Last Updated : May 28, 2021, 8:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.