ETV Bharat / city

Nitesh Rane ON CM Thackeray : नोटिसा काय पाठवता मैदानात येऊन लढा - नितेश राणेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान - नितेश राणेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान

मुंबई महानगरपालिकेंतर्गत नोटीसा पाठवण्यापेक्षा मैदानात येऊन आमच्याशी लढा असे खुले आव्हान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Nitish Rane ON CM Thackeray ) यांना दिले आहे. आमदार नितेश राणे हे सोलापूरहुन तुळजापूरकडे जाताना विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला.

Nitish Rane ON CM Thackeray
नितेश राणे
author img

By

Published : Mar 21, 2022, 3:42 PM IST

सोलापूर - घराच्या बांधकामावरुन मिळालेल्या नोटीसीला कायदेशीर उत्तर देऊ. पण मुख्यमंत्री घरात बसून कंटाळलेले आहेत. नोटीसा पाठवण्यापेक्षा मैदानात येऊन आमच्याशी लढा असे खुले आव्हान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Nitish Rane ON CM Thackeray ) यांना दिले आहे. आमदार राणे हे आपल्या कुटुंबियांसह सोमवारी तुळजापूरला दर्शनासाठी सोलापूर विमानतळावर ( MLA Nitesh Rane in Solapur Airport ) आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नितेश राणे यांची प्रतिक्रिया

'जनाब बाळासाहेब हे शिवसेनेने लिहिले'

'आताची शिवसेना बाळासाहेबांची नाही. ती दाऊदची बी टीम झाली आहे. हिंदुत्व सोडलेले आहे म्हणून ते अजाणची स्पर्धा घेत आहेत. जनाब बाळासाहेब हे सेनेच्या बॅनरवर शिवसेनेनेचं लिहिले. आम्ही नाही लिहिले' असे वक्तव्य आमदार राणे यांनी केले आहे.

'सत्तेसाठी लाचार कोण झाले हे सर्वश्रुत' -

आम्हांला सत्तेसाठी लाचार व्हायची गरज नाही.महाराष्ट्राने पाहिलं आहे कोण लाचार आहे ते सर्वांना माहिती आहे.संजय राऊतांसारखी माणसं सोलापूरच्या बाजारात खूप भेटतात. त्याला किती महत्व द्यायचे ठरवून घेतले आहे.

हेही वाचा - China Eastern Airlines Aircraft Accident : चीनमध्ये 133 प्रवाशी घेऊन जाणारे विमान कोसळले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.