ETV Bharat / city

सोलापुरात उलटला मासे नेणारा ट्रक, मासे उचलण्यासाठी उडाली नागरिकांची झुंबड - सोलापूर जिल्हा बातमी

कर्नाटकच्या हुबळीहून नागपूरला मासे घेऊन जाणारा ट्रक सोलापुरातील कंबर तलावा परिसरात उलटला होता. यामुळे ट्रकमधील मासे कंबंर तलावच्या परिसरातील सांडपाणीच्या डबक्यात पडले. ते मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची धुंबड उडाली होती.

मासे गोळा करताना
मासे गोळा करताना
author img

By

Published : May 8, 2021, 3:56 PM IST

Updated : May 8, 2021, 10:17 PM IST

सोलापूर - शहरात असलेल्या संभाजी तलाव शेजारी पुलावर मासे वाहून नेणारा ट्रक शनिवारी (दि. 8 मे) सकाळी उलटला. यामुळे ट्रकमधील मासे ट्रकच्या बाहेर फेकले गेले. याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची कंबर तलाव परिसरात झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले.

घटनास्थळ

ट्रक सांडपाण्याच्या शेजारी उलटल्याने बहुतांश मासे सांडपाण्यात पडले होते. तरीही नागरिकांनी घाण पाण्यातील मासे घेण्यासाठी गटारीत उतरून मासे गोळा केले. या ठिकाणी गर्दी झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत नागरिकांना हुसकावून लावले. हा सर्व प्रकार ट्रक चालक हताश होऊन पाहत होता. सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.

मांगूर मासे घेऊन नागपूरला निघाला होता ट्रक

मांगूर जातीचे मासे ट्रक घेऊन जात होता. रात्रभर ट्रक चालवल्याने चालकाला झोपेची डुलकी लागत होती. संभाजी तलाव (कंबर तलाव) परिसरात सकाळी चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटला. त्यामुळे तलाव परिसरातील दुभाजकाला ट्रक धडकला आणि ट्रकमधील मासे सांडपाण्यात पडले.

घाण पाण्यातील मासे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

संभाजी तलाव (कंबर तलाव) परिसरात असलेल्या डबक्यात बहुतांश मासे पडले होते. घाण पाण्यात मासे पकडत असल्याचे किळसवाना प्रकार दिसत होता. संभाजी तलावाच्या बाजूलाच सोलापूर-विजापूर महामार्ग आहे. या मार्गावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. येणारे-जाणारे नागरीक घाण पाण्यातून मासे पकडताना रस्त्यावरच थांबून पाहत होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन हुसकावून लावले

घाण पाण्यात उतरून, कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत लोक मासे गोळा करत होते. सोलापूर-विजापूर महामार्गवर ये-जा करणाऱ्या नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घाण पाण्यात मासेमारी किंवा मासे लुटणाऱ्या नागरिकांना हुसकावून लावले.

हेही वाचा -'प्राण जाये पण पाणी न जाये', उजनीच्या पाणी प्रश्नावरून आमदार प्रणिती शिंदे संतापल्या

Last Updated : May 8, 2021, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.