ETV Bharat / city

धनगर समाजाचे नेतृत्व कोणाकडे या वादातून मारहाण, आमदार पडळकरांनी घेतली जखमीची भेट - soalpur dhangar community rada news

शरणू हांडे व अर्जुन सलगर यांमध्ये सोशल मीडियावरून वादावादीस सुरुवात झाली. या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. रविवारी रात्री शरणू हांडे यांवर चाकू हल्ला झाला. अर्जुन सलगर यांच्या कार्यकर्त्यांनी शरणू हांडे यांना कार्यालयावर बोलावले असता हांडे याने जाण्यास टाळाटाळ केली. रविवारी मध्यरात्री हांडे यांच्या घरी जाऊन बाहेर बोलावले व मारहाण करण्यास सुरुवात झाली. यामध्ये हांडे यांना जबर मार लागले आहे. जखमी हांडे यांना सोमवारी पहाटे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

bjp mla gopichand padalkar visit to injured supporter at solapur civil hospital
धनगर समाजाच्या नेतृत्व कोणाकडे या वादावरुन मारहाण
author img

By

Published : Sep 28, 2020, 10:21 PM IST

Updated : Sep 28, 2020, 10:36 PM IST

सोलापूर - धनगर समाजाचे नेतृत्व कोणाकडे या वादावरून शरणू शिवराय हांडे ( वय 29 रा, मल्लिकार्जुन नगर,अक्कलकोट रोड, सोलापूर) याच्यावर रविवारी मध्यरात्री चाकूने हल्ला झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अर्जुन सलगर, सुजित कोपरे, अनिकेत तुळ, लखन गावडे आणि अन्य चार संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी पहाटे सोलापूर शासकीय रुग्णालय गाठले. जखमीची विचारपूस केली.

धनगर समाजाचे नेतृत्व कोणाकडे या वादातून मारहाण, आमदार पडळकरांनी घेतली जखमीची भेट

धनगर समाजच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ढोल बाजावो सरकार जगावो आंदोलन झाले होते. आंदोलनानंतर गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरात माध्यमांना माहिती दिली होती. सोलापुरात देखील धनगर समाजाच्या वतीने अरक्षणासाठी ढोल बाजावो आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतर अर्जुन सलगर यांनी माध्यमांसमोर आरक्षणाबाबत मागणी करत माहिती दिली होती.

त्यानंतर शरणू हांडे व अर्जुन सलगर यांमध्ये सोशल मीडियावरून वादावादीस सुरुवात झाली. या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले. रविवारी रात्री शरणू हांडे यांवर चाकू हल्ला झाला. अर्जुन सलगर यांच्या कार्यकर्त्यांनी शरणू हांडे यांना कार्यालयावर बोलावले असता हांडे याने जाण्यास टाळाटाळ केली. रविवारी मध्यरात्री हांडे यांच्या घरी जाऊन बाहेर बोलावले व मारहाण करण्यास सुरुवात झाली. यामध्ये हांडे यांना जबर मार लागले आहे. जखमी हांडे यांना सोमवारी पहाटे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार गोपीचंद पडळकर सोमवारी पहाटे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. जखमींची विचारपूस करून रवाना झाले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.

Last Updated : Sep 28, 2020, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.