ETV Bharat / city

वीज बिलाचा प्रश्न सुटत नसेल तर ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा द्यावा - सुभाष देशमुख - ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा द्यावा

साखर कारखान्याना पत्र देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वीजबिल उसाच्या बिलातून कट करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जा मंत्र्यांकडून जर वीज बिलाचा प्रश्न सुटत नसेल आणि मुख्यमंत्री, अर्थमंत्री ऐकत नसतील तर त्यांनी राजीनामा देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे, अशा शब्दात भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी संताप व्यक्त केला.

सुभाष
सुभाष
author img

By

Published : Nov 16, 2021, 2:28 AM IST

Updated : Nov 16, 2021, 2:43 AM IST

सोलापूर - युती सरकारच्या पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांचे एकदाही वीज कनेक्शन कट केले नव्हते. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना त्रास देणे सुरू केले आहे. आता तर दादागिरी करत साखर कारखान्याना पत्र देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वीजबिल उसाच्या बिलातून कट करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जा मंत्र्यांकडून जर वीज बिलाचा प्रश्न सुटत नसेल आणि मुख्यमंत्री, अर्थमंत्री ऐकत नसतील तर त्यांनी राजीनामा देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे, अशा शब्दात भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांचे विद्युत पुरवठा खंडित करू नये, या मागणीसाठी महावितरणच्या मुख्य कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.

भाजपा आमदार सुभाष देशमुख

महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन

शेतकऱ्यांचे थकीत वीजबिल उस दरातून वसूल करण्यात येत आहे. उस बिलातून लाइट बिल वसूल करण्यात कपात करण्यात येऊ नये. सिंगल फेज डीपीवरील बऱ्याच ठिकाणी तीन पैकी एकच चिमणी (डब्या) आहे. उर्वरित चिमण्या तत्काळ बसवाव्या. नवीन शेतीपंपाच्या सर्व अडचणी दूर कराव्यात. बऱ्याच वाड्या वस्त्यांवर सिंगल फेजची व्यवस्था अद्याप व्यवस्था नाही. नवीन सिंगल फेज योजना कार्यान्वित करावी. घरगुती व व्यावसायिकांना कोरोना काळात वीज कमी प्रमाणात वापरली असून देखील वीजबिल भरमसाठ आलेली आहेत. अशा विविध मागण्यासाठी भाजपा आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - ST STRIKE UPDATE कारवाईची नोटीस मागे घ्या, अन्यथा एसटी महामंडळाला टाळे ठोकू - प्रवीण दरेकर

Last Updated : Nov 16, 2021, 2:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.