ETV Bharat / city

Solapur Police Threatens : बजरंग दलाच्या कार्यकत्यांना अटक केल्यावर सोलापूर पोलिसाला धमकी; 'गडचिरोलीला बदली करू का?'

पुणे येथील विकी कुलकर्णी या व्यक्तीने सदर बाजार पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत असणाऱ्या बाळू सूर्यकांत जाधव यांना मोबाईलवर धमकी ( Solapur Police Threatens ) दिली आहे. पोलीस नाईक बाळू जाधव यांनी याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. बजरंग दलाने केलेल्या आंदोलकांवर गुन्हा का दाखल केला, तुमच्या अधिकाऱ्यांची बदली करायला लावेन, गडचिरोली जिल्ह्यात जाण्याची तयारी ठेवा' असा धमकीवजा कॉल करून पोलिसांत भितीदायक वातावरण निर्माण केल्याची तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Solapur Police Threatens
सदर बाजार पोलीस ठाणे
author img

By

Published : Feb 25, 2022, 6:05 PM IST

Updated : Feb 25, 2022, 7:20 PM IST

सोलापूर - पुणे येथील विकी कुलकर्णी या व्यक्तीने सदर बाजार पोलीस ठाण्यात ( Sadar Bazar Police Threatened ) पोलीस नाईक पदावर कार्यरत असणाऱ्या बाळू सूर्यकांत जाधव यांना मोबाईलवर धमकी ( Solapur Police Threatens ) दिली आहे. पोलीस नाईक बाळू जाधव यांनी याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. बजरंग दलाने केलेल्या आंदोलकांवर गुन्हा का दाखल केला, तुमच्या अधिकाऱ्यांची बदली करायला लावेन, गडचिरोली जिल्ह्यात जाण्याची तयारी ठेवा' असा धमकीवजा कॉल करून पोलिसांत भितीदायक वातावरण निर्माण केल्याची तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Solapur Police Threatens
बजरंग दल कार्यकत्यांचे आंदोलन

बजरंग दलाचे आंदोलन झाले होते -

मंगळवारी 23 फेब्रुवारी रोजी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे मोठे आंदोलन झाले. कर्नाटक येथील शिवमोगा जिल्ह्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली होती. त्याविरुद्ध सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन केले. आणि कर्नाटक येथील घटनेचा निषेध केला. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले होते. सदर बाजार पोलिसांनी आंदोलनानंतर सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला ( Solapur police arrested Bajrang Dal activist ) होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचा आंदोलनाच्या ठिकाणी अनेकांनी विरोध केला होता.

धमकी दिल्याने गुन्हा दाखल -

आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर विकी कुलकर्णी याने बाळू जाधव या पोलीस नाईकाला फोनवरून धमकी दिली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अटक का केली असा जाब विचारत 'तुमच्या अधिकाऱ्यांना गडचिरोली जायची तयारी ठेवा' असे सांगितले. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात भा.द.वि.186 आणि 507 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक देंडे करत आहेत.

हेही वाचा - Terrible accident in Mumbai : मुंबईत हृदयदावक भीषण अपघात, हायवाने दुचाकीस्वाराला चिरडले

Last Updated : Feb 25, 2022, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.