सोलापूर - अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रचार, प्रसार ग्रामीण भागातील प्रत्येक घराघरात पोहचावा, यासाठी मंडळाची नवीन जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे.
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सर्व समित्या जिल्हाध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आल्या. समित्यांच्या निवडीसाठीची बैठक श्री संत मुक्ताई मंदिर या ठिकाणी आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीला सोलापूर शहर, दक्षिण तालुका, उत्तर तालुका, सोलापूर शहरातील उत्तर विभाग, दक्षिण विभाग, पश्चिम विभाग, पूर्व विभाग येथील वारकरी संप्रदायातील लोकांचा समावेश असलेल्या समित्या तयार करण्यात आल्या.
युवकांना ही काम करण्याची संधी मिळावी म्हणून युवक कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. एकूण आठ समित्या तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली. यावेळी लोकमंगल बँकेचे व्यवस्थापक दिनकर देशमुख, ह.भ.प. अनंत महाराज इंगळे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व बहुसंख्येने वारकरी उपस्थित होते.
अखिल वारकरी मंडळाची नवीन जिल्हा कार्यकारिणी
ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे - जिल्हाध्यक्ष
ह.भ.प.बंडू कुलकर्णी- उपाध्यक्ष
ह.भ.प.बळीराम जांभळे- सचिव
ह.भ.प.ज्योतीराम चांगभले- सोलापूर शहर अध्यक्ष
ह.भ.प. संजय पाटील- सोलापूर दक्षिण तालुकाध्यक्ष
निवृत्ती पवार- सोलापूर उत्तर तालुकाध्यक्ष
किरण कुलकर्णी-शहर उत्तर विभाग अध्यक्ष
सचिन गायकवाड- शहर दक्षिण विभाग अध्यक्ष
महेश चोरमुले- शहर पश्चिम विभाग अध्यक्ष
लक्ष्मण देविदास- शहर पूर्व विभाग अध्यक्ष
गोंविद लोंढे- युवक कार्यकारिणी अध्यक्ष
भाऊसाहेब बेलेराव- युवक कार्यकारिणी कार्याध्यक्ष