ETV Bharat / city

दोन महिन्यानंतर विडी कारखाने सुरू; रॅपिड टेस्ट करून तंबाखू, विडीपत्ता वितरित - VD factories news

कोरोना महामारीची तीव्रता नियंत्रणात येत असताना विडी कारखाने सुरू करा, या मागणीने जोर धरला होता. अखेर आज सोमवारी 7 जून पासून शहरातील सर्व विडी कारखाने सुरू करण्यात आली आहे. पण तंबाखू आणि विडीपत्ता घेण्यासाठी आलेल्या सर्व महिलांची रॅपिड टेस्ट करून त्यांना विडी तंबाखू आणि विडीपत्ता देण्यात आला आहे.

तब्बल दोन महिन्यानंतर विडी कारखाने सुरू
तब्बल दोन महिन्यानंतर विडी कारखाने सुरू
author img

By

Published : Jun 7, 2021, 10:12 PM IST

सोलापूर - कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून विडी कारखाने बंद करण्यात आले होते. जवळपास 60 ते 65 हजार महिलांना विडी उद्योगातून रोजगार मिळतो. पण कोरोनाची दुसरी लाट आणि कडक लॉकडाऊन यामुळे विडी उद्योगावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली होती. कोरोना महामारीची तीव्रता नियंत्रणात येत असताना विडी कारखाने सुरू करा, या मागणीने जोर धरला होता. अखेर आज सोमवारी 7 जून पासून शहरातील सर्व विडी कारखाने सुरू करण्यात आली आहे. पण तंबाखू आणि विडीपत्ता घेण्यासाठी आलेल्या सर्व महिलांची रॅपिड टेस्ट करून त्यांना विडी तंबाखू आणि विडीपत्ता देण्यात आला आहे. सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पुढाकार घेत सोलापूर महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शहर आरोग्य प्रशासनाच्या टीममधील कर्मचाऱ्यांना सोबत घेत अँटीजेन टेस्ट घेण्यात आली.

दोन महिन्यानंतर विडी कारखाने सुरू; रॅपिड टेस्ट करून तंबाखू, विडीपत्ता वितरित

तीन विडी कारखान्यात 600 महिलांची टेस्ट
सोलापुरातील तीन प्रमुख विडी कारखान्यात रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. सोमवारी 7 जून रोजी दिवसभर विडी कामगार महिलांची टेस्ट घेण्यात आली. यामध्ये ठाकूर सावदेकर विडी कारखाना, लंगर विडी कारखाना व साबळे टोबॉको विडी कारखाना येथे मोफत अँटीजेन टेस्ट करण्याची सोय करण्यात आली होती. यामध्ये 600 विडी कामगारांची चाचणी करण्यात आली. एकाही महिलेला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे अहवाल प्राप्त झाले. सर्व विडी कामगार महिलांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

रॅपिड टेस्ट करून विडी तंबाखू आणि विडीपत्ता वितरित केला
सोलापुरात अनेक गोरगरीब महिलांना विडी उद्योगामधून रोजगार प्राप्त झाला आहे. या महिला मुखत्वेकरून झोपडपट्टी भागात राहतात. येथे कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे संसर्गजन्य महामारीचा फैलाव होऊ नये म्हणून रॅपिड टेस्ट घेतली. ही टेस्ट करून घेण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. टेस्टमधून सर्व 600 महिलांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आलेल्या महिलांना विडी तंबाखू आणि विडीपत्ता वितरित करण्यात आला. यावेळी उपायुक्त धनराज पांडे, तिरुपती परकीपंडला व बहुसंख्य विडी कामगार उपस्थित होते.

हेही वाचा - Pune Fire: पिरंगुट MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग, 18 कामगारांचा होरपळून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.