ETV Bharat / city

ज्याच्याकडे खूप पैसा आहे तिथे इडी लागते - अभिनेत्री दीपाली सय्यद - भोसले

author img

By

Published : Mar 24, 2022, 7:30 AM IST

ईडी सगळीकडे लागत चाललेली आहे आणि ज्याच्याकडे खूप पैसा असतो तिथे इडी लागते, असे वक्तव्य सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद - भोसले यांनी सोलापुरात केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मलमत्तेवार ईडी छापे टाकत आहे.

Actress Deepali Syed Bhosle comment on ED
ईडी कारवाई अभिनंत्री दीपाली सय्यद भोसले प्रतिक्रिया

सोलापूर - ईडी सगळीकडे लागत चाललेली आहे आणि ज्याच्याकडे खूप पैसा असतो तिथे इडी लागते, असे वक्तव्य सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद - भोसले यांनी सोलापुरात केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मलमत्तेवार ईडी छापे टाकत आहे. त्यांची 6 कोटींची मालमत्ता जप्तही झाली आहे. या पार्श्वभूमीवर दीपाली सय्यद भोसले यांनी हे वक्तव्य केले आहे.

प्रतिक्रिया देताना अभिनेत्री दीपाली सय्यद - भोसले

हेही वाचा - Ranjit Singh Disley: ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले गुरुजींवर होणार शिस्तभंगाची कारवाई?

उद्धव ठाकरे खूप समजदारीने प्रश्न सोडवतील - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खूप समजदार आहेत. आणि मी शिवसेनेत असल्यामुळे मला माहिती आहे. ज्या पद्धतीने ते पुढाकार घेऊन काम करत आहेत ते योग्य पद्धतीने प्रश्न सोडवतील. तो त्यांचा खासगी विषय असल्याने जास्त बोलण्यात अर्थ नाही, असेही दीपाली सय्यद - भोसले म्हणाल्या.

महिलांसाठी महाराष्ट्र केसरी होणे गरजेचे - दीपाली सय्यद भोसले या सोलापुरातील डीबीएस फाउंडेशनच्या उद्घाटनसाठी आल्या होत्या. डीबीएस फाउंडेशन हे महिलांसाठी कुस्ती केंद्र आहे. महिलांना पैलवानकी क्षेत्रात जास्त वाव नाही. त्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करून जनजागृती करणार असल्याची माहिती यावेळी दीपाली यांनी दिली. ज्याप्रमाणे पुरुष पैलवानांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते, तसेच महिलांसाठी देखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हायला पाहिजे, असे मत दीपाली यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - Solapur Fire : सोलापुरातील चाटी गल्लीतील जुन्या वाड्यांना आग; गॅस सिलेंडरच्या स्फोटाने गल्ली हादरली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.