ETV Bharat / city

सोलापुरात आढळले 9 कोरोना पॉझिटिव्ह, एकूण संख्या 111 - solapur corona 111

आत्तापर्यंत 1860 जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 1531 जणांची निगेटिव्ह तर 111 जणांची पॉझिटिव्ह चाचणी आली आहे. शुक्रवारी जे 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये 4 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे.

solapur corona
solapur corona
author img

By

Published : May 2, 2020, 7:31 AM IST

सोलापूर --दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असली तरी काही रुग्ण कोरोनामधून बरे देखील होत आहेत. कोरोनापासून पूर्णपणे बरे झालेल्या 7 रुग्णांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले आहे. तर, नव्याने 9 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या ही 111 झाली आहे.

मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

सोलापुरात कोरोनाबाधितांचा आकडा हा 111 पर्यंत गेला आहे. यापैकी 6 जणांना मृत्यू झाला आहे. तर 10 रुग्ण हे कोरोनामधून बरे झाले आहेत. सध्या 96 जणांवर सोलापुरातील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.ज्या सात जणानी कोरोनावर मात केली त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात बाहेर पडत असताना कोरोनावर मात केलेल्या या रुग्णांवर फूलांचा वर्षाव करून त्यांना निरोप देण्यात आला. शुक्रवारी सात जणांनी कोरोनावर मात केली आणि ते घरी परतले आहेत.

सोलापुरातील कोरोनाबाधितानची संख्या आता 111 इतकी झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी आणखीन 7 जणांना त्यांची 14 दिवसानंतरची चाचणी निगेटिव्ह आल्याने रुग्णालयातून सोडून देण्यात आले. गुरुवारपासून 10 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.

शुक्रवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत 1860 जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 1531 जणांची निगेटिव्ह तर 111 जणांची पॉझिटिव्ह चाचणी आली आहे. शुक्रवारी जे 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये 4 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. यात शास्त्रीनगर 3 पुरुष 1 महिला, बाळे संतोषनगर 1 पुरुष, ताई चौक रवींद्र नगर 1 पुरुष, 1 महिला तेलंगी पाच्छा पेठ 1 महिला, न्यू पाच्छा पेठ 1 महिला असा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.