पुणे - पुण्यातील आपल्या प्रेयसीला एका रिक्षाचालकाने पळवून नेल्यामुळे गुजराती प्रियकर चांगलाच संतप्त झाला. या प्रियकराने तब्बल 80 रिक्षाचालकांचे मोबाईल चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा सर्व प्रकार त्याने केवळ सूड घेण्यासाठी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पुणे शहरातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आसिफ उर्फ बोहरा आरिफभाई शेख असे या चोरट्या प्रियकराचे नाव आहे.
आसिफ हा मूळचा गुजरातचा आहे. प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी तो पुण्यात पळून आला होता. पुण्यात आल्यानंतर त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्याच एका रिक्षाचालक तरुणाशी सूूत जुळले. आसिफला याची खबर लागण्याच्या आतच तिने त्या रिक्षावाल्यासोबत पळ काढला. आपली प्रेयसी एका रिक्षाचालकासोबत पळून गेल्याचा जबर धक्का बसला होता. यासाठी त्याने सर्वच रिक्षाचालकांना दोषी धरले आणि त्यांना त्रास देण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबला.
अशी करायचा मोबाईल चोरी...
एखाद्या रिक्षात बसल्यानंतर तो गर्दीच्या ठिकाणी रिक्षा घेऊन जायचा. त्यानंतर माझा मोबाईल मित्राकडे विसरला असून त्याला बोलावून घेण्यासाठी रिक्षाचालकाचा फोन घ्यायचा. त्यानंतर फोन लावण्याचा बहाणा करून रिक्षापासून लांब जात पळून जायचा. अशाप्रकारे त्याने आतापर्यंत 80 मोबाईल चोरले होते.
पुण्याच्या प्रेयसीनं ठोकली रिक्षावाल्यासोबत धूम, गुजरातच्या प्रियकरानं 'असा' उगवला सूड
आसिफ हा मूळचा गुजरातचा आहे. प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी तो पुण्यात पळून आला होता. पुण्यात आल्यानंतर त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्याच एका रिक्षा चालक तरुणाशी सूूत जुळले.