पुणे - पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात एका स्पा सेंटरमध्ये मसाज करण्यासाठी आलेल्या तरुणीसोबत लज्जास्पद प्रकार घडला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी मंदार साळुंखे या कर्मचाऱ्याविरोधात विनयभांगाचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - पुण्यात धक्कादायक प्रकार..! धमकी देत छायाचित्र प्रदर्शन बंद पाडले
ही घटना ९ जानेवारीला घडली असून फिर्यदी तरुणीने लागलीच काल या तरुणाविरोधात तक्रार केल्यानंतर डेक्कन पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल करून घेतला आहे. पुण्यातील एफ.सी रोडवर असलेल्या हेअर आर्ट या स्पा सेंटरमध्ये ही घटना घडली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हेअर स्पा करण्यासाठी डेक्कन जिमखाना परिसरातील हेअर आर्ट सेंटरमध्ये गेली होती. दरम्यान तिथे काम करणाऱ्या मंदार नावाच्या तरुणाने मसाज करत असताना तरुणीशी अश्लील चाळे केले आणि तिच्या अंगाला संशयास्पद हात लावला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी तरुणाविरोधात ३५४ अंतर्गत विनयभंगाच गुन्हा नोंदवला असून या प्रकरणी पुढील तपास डेक्कन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कांबळे करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली.