ETV Bharat / city

हाथरस घटनेत उत्तर प्रदेश सरकारचा बेजबाबदारपणा - नीलम गोऱ्हे - नीलम गोऱ्हे बातमी

केंद्र सरकार अभिनेत्रीला तत्काळ संरक्षण देते. मात्र, दुसरीकडे सामान्य महिला- तरुणी सुरक्षित नाहीत, अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उत्तर प्रदेश सरकारवर केली आहे.

Neelam Gorhe
नीलम गोऱ्हे - नेत्या, शिवसेना
author img

By

Published : Sep 30, 2020, 5:16 PM IST

पुणे - उत्तर प्रदेशमध्ये महिला सुरक्षित नाहीत आणि तिथे फिल्म सिटी काढायला निघाले आहेत. केंद्र सरकार अभिनेत्रीला तत्काळ संरक्षण देते. मात्र, दुसरीकडे सामान्य महिला- तरुणी सुरक्षित नाहीत, अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उत्तर प्रदेश सरकारवर केली आहे.

नीलम गोऱ्हे - नेत्या, शिवसेना

साक्षीदार संरक्षण कायदा आणि संबंधीत मुलींना संरक्षण देणे तसेच अशा आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होणे गरजेचे आहे. सरकारने त्यासाठी पावलं उचलली पाहिजे, ते अतिशय गरजेचे आहे. यासंदर्भात राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून, उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणात बेजबाबदारपणा आणि अतिशय अयोग्य वर्तन केले आहे. या विषयाकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. या गुन्हेगारांना एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

हाथरसच्या घटनेमधून उत्तर प्रदेशात महिला सुरक्षासंदर्भात असलेली भीषण अवस्था समोर आली आहे. या घटनेत उत्तर प्रदेश सरकारमधील बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.