ETV Bharat / city

World Soil Day 2021 : माती खाल्यामुळे शरीरावर काय परिणाम होतो? डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले... - गर्भवती महिलांना माती खाण्याचं व्यसन

मातीचा वापर हा अन्नधान्यसाठी होत असला तरी काही नागरिकांना माती खायला आवडते. विशेषत: गर्भवती महिलांना माती खाण्याची इच्छा जास्त असते. याचा आरोग्यावर परिणाम होते, असं मत इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी ( Dr. Avinash Bhondve on Soil Eating ) व्यक्त केलं आहे.

Dr. Avinash Bhondve
डॉ.अविनाश भोंडवे
author img

By

Published : Dec 5, 2021, 1:33 PM IST

पुणे - जागतिक मृदा दिन ( World Soil Day 2021 ) ५ डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. मृदा ( Soil ) म्हणजेच माती. मातीचं संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. आरोग्यदायक माती हा आरोग्यदायी अन्न निर्मितीचा पाया आहे. अन्नधान्याच्या 90 टक्के गरजा मातीद्वारे पूर्ण होतात. मात्र, मातीचा वापर हा अन्नधान्यसाठी होत असला तरी काही नागरिकांना माती खायला आवडते. विशेषत: गर्भवती महिलांना ( Pregnant Women Soil Eating ) माती खाण्याची इच्छा जास्त असते. याचा आरोग्यावर परिणाम होते, असं मत इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केलं आहे.

'माती' खाण्याचं व्यसनावर डॉ अविनाश भोंडवे
गर्भावर परिणाम -आरोग्य उत्तम राहण्यासाठी चौरस आहार किंवा संतुलित आहार असणं गरजेचं असतं. उत्तम आरोग्यासाठी जंग फूड तसेच फास्ट फूड खाणे टाळलं पाहिजे. मात्र, काही जण आवडीने या गोष्टी खातात. गर्भवती असल्यानंतर महिलांमध्ये अनेक बदल होतात. त्यांच्यामध्ये अन्नवासना निर्माण होते. यात काही गर्भवती महिलांना माती खाण्याची इच्छा होते. ऍनिमिया आणि लोह कमी असल्याने महिलांना या गोष्टी खातात. मात्र, माती बरोबर जंतू देखील पोटात जातात. याचा परिणाम थेट स्त्रीच्या गर्भावर होऊ शकतो, असे भोंडवे यांनी सांगितले.सवय मोडण्यासाठी काय करावं - महिलांना किंवा गर्भवती महिलांना माती खायची सवय असल्यास ती सवय मोडण्यासाठी विविध उपाय आहेत. गर्भवती महिलांमध्ये लोह कमी असल्याने माती खाण्याची इच्छा होते. आशावेळी त्यांना शरिरातील लोह वाढेल, या गोळ्या द्याव्यात. गर्भवती महिलांना बाळ अंगावर पित असे पर्यंत लोहाच्या गोळ्या घ्याव्यात, असे भोंडवे यांनी सांगितले. महिला, गर्भवती महिला आणि सर्वसामान्य नागरिक यांना देखील जास्त प्रमाणात माती खाण्याची सवय असेल तर अशा लोकांनी जंतूची गोळी खावी. माती खाण्याचा प्रकार हा जास्त असला तर तो एक प्रकारे मानसिक आजार असतो. त्यावर मानसिक उपचारदेखील करावेत, असे भोंडवे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.