ETV Bharat / city

World Mental Health Day : मनोरुग्णालयात चालवले जातात व्यवसायिक प्रशिक्षण; मनोरुग्ण बनवतात हे साहित्य - psychiatric hospitals in pune

जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा दिवस म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी जगभरात मानसिक आरोग्याचे महत्त्व (Importance of mental health ) स्पष्ट करण्यासाठी साजरा केला जातो. लोकांमध्ये मानसिक समस्यांविषयी जागरूकता पसरवणे ( Spreading awareness about mental health issues ) हा त्याचा हेतू आहे. इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात ( Pune Regional Psychiatric Hospital )1100 हून अधिक रुग्ण हे उपचार घेत असून औषोधोपचारासह येथे असलेल्या रुग्णांना विविध उपचार पद्धतीने उपचार केले जात आहे.

World Mental Health Day
जागतिक मानसिक आरोग्य दिवस
author img

By

Published : Oct 9, 2022, 9:25 AM IST

Updated : Oct 9, 2022, 10:47 AM IST

पुणे : मनोरुग्णालय म्हणजे सामान्यांच्या भाषेतील पागलखाना. गावापासून दूर असणारा, समाजाच्या सर्व अंगांपासून तुटलेला. त्याच्या आत काय चालते ? याची खबरबात बाहेरच्या दुनियेला नसलेला अन् बरे ती असावी असेही फारसे कुणाला वाटत नसलेला. तरीही मनोरुग्णालय ही मनोरुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची; तशीच समाजाची सुद्धा एक अत्यंत महत्वाची आवश्यकता असते. प्रत्येकजण मानसिक दबावातून जात आहे. पण फार कमी लोक त्याला महत्त्व देतात. या अज्ञानामुळे तो मानसिक तणाव, नैराश्य, उन्माद, स्मृतिभ्रंश, फोबिया यासारख्या मानसिक आजाराचा बळी ठरतो. ( Pune Regional Psychiatric Hospital )

जागतिक मानसिक आरोग्य दिवस

जागतिक मानसिक आरोग्य दिवस : जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा दिवस म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी जगभरात मानसिक आरोग्याचे महत्त्व (Importance of mental health ) स्पष्ट करण्यासाठी साजरा केला जातो. लोकांमध्ये मानसिक समस्यांविषयी जागरूकता पसरवणे ( Spreading awareness about mental health issues ) हा त्याचा हेतू आहे. इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात ( Pune Regional Psychiatric Hospital )1100 हून अधिक रुग्ण हे उपचार घेत असून औषोधोपचारासह येथे असलेल्या रुग्णांना विविध उपचार पद्धतीने उपचार केले जात आहे. यातील सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे व्यवसायिक प्रशिक्षण. या व्यवसायिक प्रशिक्षणाद्वारे येथील रुग्णांना शिलाई, पेंटिंग, फाईल्स बनविणे, सुतारकाम तसेच दिवाळी निमित्त पणत्या, आकाश कंदील, असे विविध वस्तू बनविणे शिकविले जातात.पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात कश्या पद्धतीने व्यवसायिक प्रशिक्षण दिलं जातं याबाबत व्यवसायिक उपचार तज्ञ डॉ.स्नेहल सहस्त्रकर यांच्याशी बातचीत केली आहे.

World Mental Health Day
जागतिक मानसिक आरोग्य दिवस

सध्या तरुण वयातील लोकांमध्ये वाढतोय मनोरुग्णांचा प्रमाण : प्रत्येकजण मानसिक दबावातून जात आहे. पण फार कमी लोक त्याला महत्त्व देतात. या अज्ञानामुळे तो मानसिक तणाव, नैराश्य, उन्माद, स्मृतिभ्रंश, फोबिया यासारख्या मानसिक आजाराचा बळी ठरतो. जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा दिवस म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी जगभरात मानसिक आरोग्याचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी साजरा केला जातो. लोकांमध्ये मानसिक समस्यांविषयी जागरूकता पसरवणे हा त्याचा हेतू आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिवसचा इतिहास : प्रादेशिक मनोरुग्णाया हे सुरवातीला 1907 साली कुलाब्यात सुरू करण्यात आलं होत. तेव्हा त्याची बेडची व्यवस्था ही 700 होती. त्यानंतर 1915 नंतर हे रुग्णालय एका विशेष गाडीने पुण्यातील येरवडा येथे हलविण्यात आल. हे रुग्णालय या परिसरात 85 एकर मध्ये पसरलेला आहे.ज्यात रुग्णालय,विविध विभाग, कॉटर,अशी विभागणी करण्यात आली आहे. सुरवातीला ब्रिटिशांच्या काळात जेव्हा हे रुग्णालय इथ आलं तेव्हा याच नाव रुग्णालय नव्हत. तर मनोरुग्णांसाठी असायलंम होत. शहरातील अशी जागा जिथं हे लोक व्यवस्थितपणे राहू शकता. यांच्यामुळे कोणालाही त्रास नको म्हणून हे रुग्णालय असायलंम नावाने ओळखलं जाऊ लागत होत आणि त्यानंतर जस जस सुधारणा होत गेल्या तसं तस याच स्वरूप आणि नाव बदलत गेलं. नंतर प्रादेशिक मनोरुग्णालय अस नाव झाल. आत्ता अंतरुग्नांसाठी 2540 बेड ची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती व्यवसायिक उपचार तज्ञ डॉ.स्नेहल सहस्त्रकर यांनी यावेळी दिली.

मानसिक आधाराची गरज असलेले रुग्ण मोठ्या संख्येने : पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात बेड ची क्षमता ही 2540 असून सध्या पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात 1180 रुग्ण हे ऍडमिट आहे. त्यात 667 रुग्ण पुरुष आहे तर 513 रुग्ण या महिला आहेत. या रुग्णांना दरोरोज औषधोपचार तसेच त्यांच्या ठरलेल्या दुंचाऱ्यानुसार औषधोपचार बरोबरच विविध प्रशिक्षण, तसेच विविध शिबिर घेतले जातात. तसेच डॉक्टरांकडून दरोरोज तपासणी केली जाते. पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात 954 कर्मचारी असून त्यातील 650 पदे ही भरलेली असून बाकीचं रिक्त पदे आहेत. राज्यात एकूणच मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना काळात बेरोजगारी आणि आजारपणातून मानसिक आधाराची गरज असलेले रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. सध्या रुग्णालयात सॅक्रेटरीसची जागा कमी असून ती भरली गेली पाहिजे. अंतरुग्ण आणि बाह्यरुग्ण रुग्ण असे दोन्ही विभागाच्या माध्यमांतून रुग्णांवर उपचार केले जातात. बाह्यरुग्णमध्ये रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार दिलं जातं. दरोरोज जवळजवळ 100 बाह्यरुग्णांची तपासणी केली जाते. अशी माहिती यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ लता पांढरे यांनी दिली.

हाफ वे होम संकल्पनेनुसार गेल्या 3 वर्षापासून सुरू आहे रुग्णांचे पुनर्वसन : गेल्या तीन वर्षापासून पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात जे रुग्ण बरे झाले आहेत.आणि ज्यांना घरचे लोक स्वीकारत नाहीये. अशा रुग्णांचा पुनर्वसन करण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. रुग्णालयात हाफ वे होम नावाची संकल्पना राबविण्यात येत आहे.यात कौटुंबिक पुनर्वसन 68 रुग्णांचा करण्यात आला आहे.10 रुग्णांचा सामाजिक पुनर्वसन करण्यात आले आहे. एनजीओ च्या मार्फत 13 रुग्णांचा पुनर्वसन करण्यात आला आहे. तर काही लोक हे स्वतः हा पुनर्वसन होऊन आज कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहे. अशी माहिती यावेळी डॉ.गीता कुलकर्णी यांनी दिली.

विविध उपाययोजना सुरू : पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांना औषध उपचारांबरोबर विविध सोयी सुविधा देखील दिल्या जात आहे. यात प्रामुख्याने म्युझिक थेरेपी तसेच व्यवसायिक शिबिर यांचा समावेश आहे. दिवसभरातील दिनचर्यांमध्ये रुग्णांना मानसिक दृष्टिकोन बदलावा यासाठी विविध सण उत्सवांमध्ये साहित्य बनवणे शिवणकाम फाइल्स बनवणे याचबरोबर महिलांमध्ये देखील विविध उपाय योजना केल्या जात आहे. यामुळे या मनोरुग्णांमधील दृष्टीकोन बदलण्यास मदत होत आहे.

Last Updated : Oct 9, 2022, 10:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.