पुणे पुण्यात एका महिलेची जवळपास ८० लाख रुपयांची फसवणूक woman cheated of Rs 80 lakh करण्यात आली आहे. प्रसिद्ध हॉटेल केएफसीची फ्रँचाईझी luring KFC franchisee काढून देतो असे सांगत चोरट्यांनी या महिलेला लुटले. पुण्यातल्या सायबर पोलीस ठाण्यात Pune cyber crime याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. KFC Franchise Fraud in Pune
आर्थिक गुंतवणुकीचा हव्यास नडला गेल्या तीन महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला तक्रारदार ही इस्टेट एजंट असून गेल्या काही दिवसांपासून पैशाची गुंतवणूक करण्यासाठी ती कंपनी शोधत होती. गौरव निकम, राहुल शिंदे आणि राहुल मॅथ्यू यांनी त्या महिलेशी ओळख केली. या तिघांनी त्या महिलेला केएफसी हॉटेलची फ्रँचाईजी देतो अशी बतावणी केली.
ऑनलाइन पैसे मागवून सायबर चोरटे पसार तब्बल ७९ लाख ७६ हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात पाठवण्यास सांगितले. एखाद्या मोठ्या हॉटेलची फ्रँचाईजी मिळत आहे असे वाटल्याने त्या महिलेने त्यांना रक्कम देखील पाठवली. या चोरट्यांनी या महिलेला खोटी कागदपत्रेही दाखवली आणि केएफसीची खोटी वेबसाईटही बनवली होती. पैसे पाठवल्यानंतर त्या सायबर चोरट्यांनी त्या महिलेचा ना फोन उचलला ना कुठल्याही ई-मेलला उत्तर दिले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने पोलिसात धाव घेतली.
हेही वाचा Firing On Akola Police अमरावतीत अकोला पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला सिनेस्टाइल पकडले