ETV Bharat / city

पतीने आणली पाणीपुरी, पण पत्नीने केली आत्महत्या, वाचा काय घडले... - bharti vidyapeeth police station

नवरा-बायकोत पाणीपुरीवरून मागील दोन दिवसांपासून वाद सुरू होते. त्याची अखेर अशाप्रकारे झाली आणि बायकोला आपला जीव गमवावा लागला.

पाणीपुरी
पाणीपुरी
author img

By

Published : Aug 31, 2021, 2:56 PM IST

Updated : Aug 31, 2021, 8:14 PM IST

पुणे - पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अगदी किरकोळ कारणावरून नवरा-बायको झालेल्या भांडणातून बायकोने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. नवरा-बायकोत पाणीपुरीवरून मागील दोन दिवसांपासून वाद सुरू होते. त्याची अखेर अशाप्रकारे झाली आणि बायकोला आपला जीव गमवावा लागला.

भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार

प्रतीक्षा गहिनीनाथ सरवदे (वय २३, रा. आंबेगाव पठार, मूळ रा. बीड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती गहिनीनाथ सरवदे (वय ३३) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत प्रकाश भिसे (वय ५५) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आंबेगाव पठार परिसरात वास्तव्य

याप्रकरणी अधिक माहिती अशी, की गहिनीनाथ आणि प्रतीक्षा यांचे २०१९मध्ये लग्न झाले होते. उच्चशिक्षित असलेला गहिनीनाथ एका चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. या दोघांना एक मुलगाही आहे. नोकरीला असल्यामुळे गहिनीनाथ पुण्यात तर पत्नी गावाकडे राहत होती. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नीला पुण्यात आणले होते. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव पठार परिसरात ते वास्तव्यास होते.

उपचारादरम्यान मृत्यू

दोन दिवसांपूर्वी गहिनीनाथ यांनी कामावरून घरी परत जात असताना घरी पाणीपुरी नेली होती. प्रतीक्षा हिने मला न विचारता पाणीपुरी का आणली, असे विचारत पतीसोबत वाद घातला. यावरूनच मागील दोन दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. शनिवारी प्रतीक्षाने रागाच्या भरात घरातील विषारी औषध घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी अखेर तिचा मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Last Updated : Aug 31, 2021, 8:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.