ETV Bharat / city

...तेव्हा हेमांगी कवी कुठे होत्या, 'बाई, बूब्स, ब्रा' वादात तृप्ती देसाईंची उडी

हेमांगी कवी यांच्या या लेखाचे आम्ही स्वागतच करतो. परंतु जेव्हा आम्ही शिर्डीतील ड्रेस कोड सक्तीविरोधात आंदोलन करत होतो, इंदुरीकर महाराज जेव्हा कीर्तनातून महिलांविषयी, त्यांच्या वेशभूषेविषयी बदनामीकारक वक्तव्य करत होते, तेव्हा हेमांगी कवी कुठे होत्या? असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे.

...तेव्हा हेमांगी कवी कुठे होत्या, 'बाई, बूब्स, ब्रा' वादात तृप्ती देसाईंची उडी
...तेव्हा हेमांगी कवी कुठे होत्या, 'बाई, बूब्स, ब्रा' वादात तृप्ती देसाईंची उडी
author img

By

Published : Jul 14, 2021, 2:02 PM IST

पुणे : सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय असलेल्या अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या 'बाई, बूब्स आणि ब्रा' या पोस्टवरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हेमांगी यांच्यावर टीका केली आहे. जेव्हा आम्ही महिलांच्या हक्काविषयी भांडत होतो तेव्हा हेमांगी कवी कुठे होत्या असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता याला हेमांगी काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

...तेव्हा हेमांगी कवी कुठे होत्या, 'बाई, बूब्स, ब्रा' वादात तृप्ती देसाईंची उडी

तृप्ती देसाईंचा हेमांगींना सवाल

अभिनेत्री हेमांगी कवी यांनी लिहिलेल्या 'बाई, बूब्स आणि ब्रा' या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. हेमांगी कवी यांच्या या पोस्टला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. स्त्रियांनी अंतर्वस्त्र वापरावीत की नाही यावरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी यांनी या पोस्ट मधून खणखणीत उत्तर दिले आहे. या वादात आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती दोस्त देसाई यांनी उडी घेतली आहे. आम्ही जेवा महिलांच्या हक्काविषयी भांडत होतो तेव्हा हेमांगी कवी कुठे होत्या असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी विचारला आहे.

व्हिडिओतून विचारले प्रश्न
तृप्ती देसाईंनी एका व्हिडिओतून हेमांगी कवी यांना प्रश्न विचारले आहेत. त्या म्हणतात, हेमांगी कवी या अभिनेत्रीने लिहिलेल्या फेसबुक पोस्टची काल दिवसभर चर्चा होती. खरं तर महिलांच्या या समस्यांविषयी मनमोकळेपणाने लिहिले पाहिजे. हेमांगी कवी यांच्या या लेखाचे आम्ही स्वागतच करतो. परंतु जेव्हा आम्ही शिर्डीतील ड्रेस कोड सक्तीविरोधात आंदोलन करत होतो, इंदुरीकर महाराज जेव्हा कीर्तनातून महिलांविषयी, त्यांच्या वेशभूषेविषयी बदनामीकारक वक्तव्य करत होते, तेव्हा हेमांगी कवी कुठे होत्या? तेव्हा त्या का व्यक्त झाल्या नाही, असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे.

'नो ब्रा डे' साजरा करणार

तृप्ती देसाई म्हणाल्या, मासिक पाळीच्या विषयावरून जेव्हा महिलांविषयी दुजाभाव केला जातो, अनेक ठिकाणी महिलांवर बंदी घातली जात होती, तेव्हा आम्ही याचा विरोध करत असताना या अभिनेत्री कुठे होत्या असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला. भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात 'नो ब्रा डे' किंवा 'ब्रा लेस डे' अशा प्रकारचा एक दिवस महाराष्ट्रात साजरा करणार आहोत. त्यावेळी हेमांगी कवी यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे अशी अपेक्षाही तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - Dia Mirza Baby Boy: दिया मिर्झाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.