ETV Bharat / city

किरकोळ कारणावरून तरुणाची कोयत्याने वार करून हत्या; 5 आरोपी अटकेत

author img

By

Published : Aug 20, 2020, 4:07 PM IST

आरोपी ज्ञानेश्वर आणि अजय यांचा वडापावचा गाडा असून तिथे येऊन मृत शुभम हा शिवीगाळ करायचा. तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. हे प्रकरण मिटवायचं असं ठरलं, त्यानुसार शुभमला तापकीर चौकातील एका मंगल कार्यालयात बोलवण्यात आले. तेव्हा संबंधित आरोपी आणि शुभम यांच्या किरकोळ वाद झाले आणि यातूनच शुभमचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला.

wakad police on shubham nakhate murder case
किरकोळ कारणावरून तरुणाची कोयत्याने वार करून हत्या; 5 आरोपी अटकेत

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडीमध्ये झालेला खून हा किरकोळ कारणावरून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत हा आरोपींना शिवीगाळ करत असल्याचा कारणावरून, त्या तरुणांनी खून केला असल्याचे वाकड पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. या घटने प्रकरणी मृत तरुणाचे वडिल जनार्धन आत्माराम नखाते यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शुभम जनार्धन नखाते (वय 22 रा. नखाते वस्ती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय 23), अजय भारत वाकुडे (वय 23), प्रविण ज्योतिराम धुमाळ (वय 21), अविनाश धनराज भंडारी (वय 23), मोरेश्वर रमेश आस्टे (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून अद्याप भाजपा नगर सेविकेचा मुलगा राज तापकीर आणि प्रेम वाघमारे हे दोघे फरार आहेत. दरम्यान आरोपींना चार दिवसांनी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

माहिती देताना पोलीस....
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी ज्ञानेश्वर आणि अजय यांचा वडापावचा गाडा असून तिथे येऊन मृत शुभम हा शिवीगाळ करायचा. तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. हे प्रकरण मिटवायचं अस ठरलं, त्यानुसार मृत शुभमला तापकीर चौकातील एका मंगल कार्यालयात बोलवण्यात आले. तेव्हा संबंधित आरोपी आणि शुभम यांच्या किरकोळ वाद झाले आणि यातूनच शुभमचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींनी खून करून घटनस्थळावरून पळ काढला. या प्रकरणी वाकड पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून दोन जण फरार आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने हे करत आहेत.

हेही वाचा - अलगीकरण सुट्टीच्या मागणीसाठी ससून रुग्णालयाच्या नर्सचे आंदोलन

हेही वाचा - दूध दरवाढ : बारामतीत 'स्वाभिमानी' आंदोलन, शरद पवारांच्या निवासस्थानी राजू शेट्टी आणणार जनावरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.