ETV Bharat / city

कोणी वाहन घेत का वाहन? दिवाळीतही वाहन खरेदीला 50 टक्के ग्रहण - दसरा वाहन विक्री

बीएस 4 च्या तुलनेत बीएस 6 या नवीन वाहनांच्या किमतीत 15 हजारांचा फरक आहे. त्यामुळे या वाहनांची किमतदेखील वाढली आहे. यंदाची दिवाळी तरी गोड होईल या आशेवर असलेल्या शोरूम चालकांना यंदा देखील 50 टक्क्यांपेक्षा अधिक फटका बसला आहे.

दिवाळीतही वाहन खरेदीला 50 टक्के ग्रहण
दिवाळीतही वाहन खरेदीला 50 टक्के ग्रहण
author img

By

Published : Nov 1, 2021, 7:01 AM IST

Updated : Nov 2, 2021, 4:41 PM IST

पुणे - यंदा कोरोनाबाधित रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याने वाहन खरेदीही जोरात होईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात दुचाकी वाहनांचे वाढलेले दर आणि लोकांच्या मनात अजूनही कोरोनाबाबत असलेल्या भीतीने यंदादेखील वाहन खरेदीला ग्रहण लागले आहे. कोणी वाहन घेत का वाहन म्हणण्याची वेळ शोरूम चालकांवर आली आहे.

आपल्याकडे दसरा-दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर घर, कार दुचाकी, यांसारख्या अनेक नवीन गोष्टींची खरेदी केली जाते. काही लोक तर फक्त दिवाळीला नवीन वस्तू खरेदी करता यावी म्हणून वर्षभर थांबतात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या सणाच्या आधीपासूनच वाहन खरेदी केल्या जातात. पण, मागील वर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे वाहन विक्रीवर परिणाम झाला. यंदा वाहनांच्या वाढलेल्या किमतीमुळे वाहन विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसत आहेत.

हेही वाचा-दिन दिन दिवाळी : गोधनाची पूजा हीच दिवाळीची समृध्द परंपरा

यंदा 50 टक्के परिणाम-

एकीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने राज्य सरकारच्यावतीने निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. मोडकळीस आलेले व्यवसाय पुन्हा उभे राहावे, यासाठी एकीकडे प्रयत्न होत असताना बीएस 4 वरून बीएस 6 प्रकारची वाहने बाजारात आली. बीएस 4 च्या तुलनेत बीएस 6 या नवीन वाहनांच्या किमतीत 15 हजारांचा फरक आहे. त्यामुळे या वाहनांची किमतदेखील वाढली आहे. यंदाची दिवाळी तरी गोड होईल या आशेवर असलेल्या शोरूम चालकांना यंदा देखील 50 टक्क्यांपेक्षा अधिक फटका बसला आहे.

हेही वाचा-काळानुरुप प्रथा परंपरा बदलणारी धनत्रयोदशी

दिवाळीच्या काळात फक्त 300 ते 400 वाहनांची विक्री

पुण्यातील नम शिवाय हिरोचे शहराभरात 4 ते 5 शोरूम आहेत. दरवर्षी दिवाळीच्या काळात 1,200 ते 1,500 वाहन विक्री होते. मागील वर्षी कोरोनाच्या काळातील लॉकडाऊमुळे दिवाळीत वाहने विक्री करता आली नाही. यंदा निर्बंध शिथिल झाल्याने चांगल्या प्रकारे वाहन विक्री होईल, अशी आशा आहे. मात्र, यंदा फक्त दिवाळीच्या काळात 300 ते 400 वाहनांची विक्री झाल्याची माहिती नम शिवाय हिरोच्या संचालक स्नेहा कळवे यांनी दिली.

हेही वाचा-दिवाळीतील पारंपारिक फराळात बदल; ड्रायफ्रुट्स, मिठाई आणि चॉकलेट्सची मागणी

Last Updated : Nov 2, 2021, 4:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.