ETV Bharat / city

यशाची गुढी; पुण्याच्या तृप्ती धोडमिसेंनी युपीएससी परीक्षेत पटकावला १६ वा क्रमांक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. पुण्याची तृप्ती धोडमिसे यांनी देशात १६ वा क्रमांक पटकावला आहे.

author img

By

Published : Apr 6, 2019, 10:22 AM IST

तृप्ती धोडमिसे

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. पुण्याची तृप्ती धोडमिसे यांनी देशात १६ वा क्रमांक पटकावला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या तृप्ती यांना आयटी क्षेत्रात करियर करण्याचा विचार होता. तृप्ती यांचे आई-वडील हे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत.

तृप्ती धोडमिसे यांची प्रतिक्रिया

सुरुवातीपासूनच तृप्ती यांचा अभ्यासाकडे ओढा होता. २०१० साली त्यांनी पुण्यात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून शिक्षण पूर्ण केले. कॅम्पसमधून त्यांना खासगी कंपनीत चांगली नोकरी मिळाली. ४ वर्षे नोकरी करत असतानाच त्यांनी राज्यसेवेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात त्यांना सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून पद मिळाले. सध्या त्या पुण्यात सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

सुधाकर नवत्रे यांच्याशी तृप्ती यांचे लग्न झाले. माहेरप्रमाणेच सासरच्या मंडळींकडून ही त्यांना प्रोत्साहन मिळाले. त्यांनी लोकसेवा आयोगाची तयारी सुरू केली. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात तृत्प्ती यांनी देशात १६ वा क्रमांक पटकावला. एकीकडे सरकारी नोकरी, दुसरीकडे घरची जबाबदारी आणि देशातील सर्वोच्च स्पर्धा परीक्षा असा तिहेरी संघर्ष त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. हे यश अपेक्षितच होते त्यामुळे अपेक्षापूर्तीचा आनंद असल्याची भावना या यशानंतर तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केली.

Intro:mh pune 03 05 truprti upsc 16th india avb 7201348Body:mh pune 03 05 truprti upsc 16th india avb 7201348

Anchor
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला या परीक्षेमध्ये पुण्याची तृप्ती धोडमिसे ही देशात 16 वी आली आहे... सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या तृप्ती यांना आयटी क्षेत्रात करियर करण्याचा विचार होता तृप्ती यांचे आई-वडील हे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक असल्याने सुरुवातीपासूनच तृप्ती यांचा अभ्यासाकडे ओढा होता आणि एक हुशार विद्यार्थिनी म्हणून त्यांची ओळख होती 2010 ला त्यांनी पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मधून शिक्षण पूर्ण। केले आणि कॅम्पस मधून त्यांना खासगी कंपनीत चांगला जॉब मिळाला चार वर्षे ही नोकरी करत असतानाच त्यांनी राज्यसेवेची तयारी सुरू केली
पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्यांना सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून पद मिळाले सध्या त्या पुण्यातच सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत दरम्यान त्यांचे सुधाकर नवत्रे यांच्याशी लग्न झाले माहेर प्रमाणेच सासरच्या मंडळींकडून ही त्यांना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी लोकसेवा आयोगाची तयारी सुरू केली आणि शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात तृत्प्ती यांनी मराठी झेंडा उंचावत देशात 16 वा क्रमांक पटकावला
एकीकडे सरकारी नोकरी, दुसरीकडे घरची जबाबदारी आणि देशातील सर्वोच्च स्पर्धा परीक्षा असा तिहेरी संघर्ष त्यांनी यशस्वी पणे पूर्ण केला हे यश अपेक्षितच होते त्यामुळे अपेक्षापूर्तीचा आनंद असल्याची भावना या यशानंतर त्यांनी व्यक्त केली

Byte तृप्ती धोडमिसे, यूपीएससी 16 वी रँकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.