ETV Bharat / city

हिंजवडीत दरोडेखोरांनी फोडली 3 दुकाने; 3 लाख 76 हजारांचा ऐवज केला लंपास - accused break the shop in pune

बुधवारी मध्यरात्रीला अज्ञात चार चोरट्यानी हिंजवडी परिसरातील राज मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटून 81 हजार रुपयांचे मोबाईल लंपास केले आहेत. तसेच प्रिन्स मार्ट स्टेशनरी अँड गिफ्ट शाँपीवर देखील चोरांनी डल्ला मारला.

crime
हिंजवडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Aug 27, 2020, 3:52 PM IST

पुणे - हिंजवडीमध्ये अज्ञात चार चोरांनी एकाच रात्रीत दोन दुकान आणि ऑफिस फोडून 3 लाख 76 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली असून आज उघड झाली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चार चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बगदाराम जयसाजी पुरोहित (वय - 27 ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अज्ञात चोरांचा हिंजवडी पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यानी हिंजवडी परिसरातील राज मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटून 81 हजार रुपयांचे मोबाईल लंपास केले आहेत. तसेच प्रिन्स मार्ट स्टेशनरी अँड गिफ्ट शाँपीवर देखील चोरांनी डल्ला मारला असून दुकानातील 50 हजार रुपयांचे गिफ्ट आणि स्टेशनरी साहित्य चोरून नेले आहे. त्याचबरोबर एका ऑफिसच्या दुकानाचे शटर उचकटून 2 लाख 45 हजार रुपयांचे मोबाईल, लपटॉप, चांदीचे कॉइन, एलसीडी चोरून नेले. एकूण 3 लाख 76 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.