पुणे - राज्यात शिंदे सरकार ( Eknath Shinde Govt ) येऊन एक महिना होत आला तरी, मंत्री मंडळाचा विस्तार ( Expansion of the State Cabinet ) अजूनही झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार का झाला नाही यावर अनेक तर्कवितरकर लावले जात आहे. आत्ता मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार हा राष्ट्रपती शपथविधीनंतर लवकरच होणार आहे असा यावेळी आठवले म्हणाले.
धनुष्यबाणही शिंदे यांना मिळेल - पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त केंद्रीय राज्य सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आले होते. यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर खरी शिवसेना कोणाची अशी चर्चा सुरू असताना आठवले यांना याबाबत विचारलं असता, ते म्हणाले की मूळ शिवसेनेत एकनाथ शिंदे हे होते. त्यामुळे ज्यांच्याकडे मेजोरीटी त्यांच्याकडे खरी शिवसेना असल्याचे ते म्हणाले. आत्ता सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार, 12 खासदार आहे. अजून 3 खासदार हे शिंदे यांच्या सोबत जाणार आहे. त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. इलेक्शन कमिशन कडून एकनाथ शिंदे यांना नक्की न्याय मिळेल. धनुष्यबाणही शिंदे यांना मिळेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
शिवसेना पुन्हा उभारी घेण्याची शक्यता नाही.- सरकार टिकेल की नाही यावर आठवेल यांना विचारलं असता ते म्हणाले की हे सरकार टिकेल. कारण या सरकारकडे बहुमत आहे. सरकार पडेल ही अफवा पसरवली जात आहे. ती अफवा खोटी असून हे सरकार अडीच वर्ष पूर्ण करेल अस यावेळी आठवले म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) उभारी घेणार का अस आठवले यांना विचारलं असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जो गट राहिला आहे तो अत्यंत छोटा गट राहिलेला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही येत्या काळात उभारी घेईल अस मला वाटत नाही. देशपातळीवर नरेंद्र मोदी हे खंबीर नेतृत्व म्हणून उभे आहे. 2024 साली देखील पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे होणार आहे. एनडीएचे 400 पेक्षा खासदार हे जिंकणार आहे. त्यामुळे मोदी यांच्या सोबत एकनाथ शिंदे हे रहाणार आहे. उद्धव ठाकरे हे जरी आमच्या सोबत नसले तरी खरी शिवसेना ही आमच्या बरोबर असणार आहे.अस देखील यावेळी आठवले म्हणाले.
हेही वाचा - Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या 'शिवसंवाद'मुळे बंडखोर आमदारांचे धाबे दणाणले?