पुणे - पुण्याहून बंदोबस्तासाठी गडचिरोलीत गेलेल्या पोलिसांनी एकमेकांवर ( Police Opened fire On Each Other ) फायरिंग केली असून या फायरींगमध्ये दोन पोलीस जागीच ( Gadchiroli Two SRPF Jawan Death ) ठार झाले आहेत. हे दोन्ही एसआरपीएफचे कर्मचारी असून गडचिरोलीमधील मरफली या गावात हा प्रकार घडला आहे. श्रीकांत बेरड, बंडू नवथरे अशी मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. हे दोघेही पुण्याचे आहेत. ही घटना दुपारी 4 च्या सुमारास घडली.
पोलीस मदत केंद्र मरपल्ली येथे हे दोघे जवान तैनातीस होते. दोघांच्या वैयक्तिक वादातून एकमेकांवर रायफलने फायर केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दोघेही दौंड पुणे येथील एसआरपीएफ कॅम्पचे जवान आहे. घटना घडल्यानंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
हेही वाचा - एकनाथ खडसे यांना ईडीचा झटका; जप्त केलेली प्रॉपर्टी 10 दिवसात खाली करण्याची नोटीस