ETV Bharat / city

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हिणी घाटात मिनीबस कोसळली, दोघांचा मृत्यू

चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुळशी ते ताम्हिणी घाटादरम्यान असलेल्या पुलाचा कठडा तोडून ही मिनीबस ओढ्यात पडली.

author img

By

Published : Apr 27, 2019, 2:23 PM IST

मिनीबस अपघात

पुणे - जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात मिनीबस कोसळून झालेल्या अपघातात 2 जण ठार झाले आहेत. तर, १० ते १२ जण जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला.

संजीवनी निवृत्ती साठे (वय ५५) आणि योगेश पाठक अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. अपघातग्रस्त मिनीबस पुण्याहून निघाली होती. अपघातात ठार झालेले दोघेजण पुण्याचे रहिवासी आहेत. कोकणातल्या केळशी भागात फिरण्यासाठी २५ जण मिनीबसमधून जात होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुळशी ते ताम्हिणी घाटादरम्यान असलेल्या पुलाचा कठडा तोडून ही मिनीबस ओढ्यात पडली.

वर्दळ नसलेल्या ठिकाणी अपघात घडल्यामुळे मदत पोहचण्यास उशीर झाला. गाडीतील इतर प्रवाशांनी प्रसंगावधान राखून अडकलेल्यांना बाहेर काढले. घटनेची माहिती पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी भेट देत जखमींना पौड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Intro:mh pune 01 27 tamhini accident av 7201348Body:mh pune 01 27 tamhini accident av 7201348

Anchor

पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात मिनीबस कोसळून झालेल्या अपघातात 2 जण ठार झाले आहेत, शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय...अपघातग्रस्त मिनीबस पुण्याहून निघाली होती तर अपघात ठार झालेले दोघे जण पुण्याचे रहिवाशी आहेत...अपघात ग्रस्त बस मधील सर्व जण हे पुण्याहून नातेवाईक तसेच मित्र असे मिळून कोकणातल्या केळशी भागात फिरायला निघाले होते 25 जण या मिनी बस मध्ये होते...चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येतंय, या अपघातात 10 ते 12 जण जखमी झाले...मुळशी ते ताम्हिणी दरम्यान असलेल्या पुलाचा कठडा तोडून ही मिनीबस ओढ्यात पडली. या अपघातात संजीवनी निवृत्ती साठे ( वय.५५ वर्ष, रा.डि.पी. रोड,औध,पुणे) ह्या जागेवरच तर योगेश पाठक यांचा पुणे येथील दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.हि घटना शनिवारी पहाटे २.४० मिनीटांच्या सुमारास घडली. घटना मध्यरात्री आणि वर्दळ नसलेल्या ठिकाणी घडल्यामुळे मदत पोहचण्यास उशीर झाला. गाडीतील इतर प्रवाशानी प्रसंगावधान राखून अडकलेल्याना बाहेर काढले...तसेच पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर याठिकाणी दाखल झाल्या आणि जखमीना पौड येथील ग्रामीण रूग्णालय तसेच लवळे फाट्यावरील मुळशी हाँस्पीटल येथे दाखल करण्यात आले. अपघातची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पौड पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.