ETV Bharat / city

गुढीपाडवा गोड झाला; पहिल्या दोन कोरोना बाधितांना पोलीस बंदोबस्तात सोडले बाहेर - निगेटीव्ह

कोरोना संसर्ग झालेल्या पुण्यातील दोन रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे या दोघांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे.

Hospital
रुग्णांना सोडताना टाळ्या वाजवताना कर्मचारी
author img

By

Published : Mar 25, 2020, 2:25 PM IST

पुणे - राज्यातील पहिल्या दोन रुग्णांना कोरोना असल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरू होते. या दोन्ही रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. त्यामुळे या रुग्णांचा गुढीपाडवा गोड झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

पुण्यात आढळलेल्या पहिल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांची दुसरी टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना प्रशासनाने आज घरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांचीही दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे प्रशासनाने उपचाराअंती त्यांना घरी सोडले. रुग्णालयातून बाहेर जाताना त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला. प्रवेशद्वारावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना डिस्चार्ज दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.