ETV Bharat / city

Copper Brass Vessel Maker: ४०० वर्षांहून अधिक काळापासून 'हा' समाज पुण्यात घडवतोय तांबे, पितळेची भांडे.. अनोखी आहे कला.. - तांबे पितळेची भांडी

अन्न, पाणी साठवण्यासाठी आपण भांडी वापरतो. पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणावर तांबे, पितळेची भांडी वापरली ( Copper Brass Vessel ) जात. अजूनही अनेक ठिकाणी अशी भांडी वापरली जातात. पुण्यात त्वष्ठा कासार समाजाकडून ( Tvashta Kasar Community Pune ) ही भांडे तयार करण्याची कला गेल्या ४०० वर्षांहून अधिक काळापासून जोपासली जात ( Cultivating Art For Over 400 Years ) आहे. तर जाणून घेऊयात या अनोख्या कलेविषयी..

४०० वर्षांहून अधिक काळापासून 'हा' समाज पुण्यात घडवतोय तांबे, पितळेची भांडे.. अनोखी आहे कला..

author img

By

Published : Mar 29, 2022, 3:49 PM IST

पुणे : मानवी जीवनाला आवश्यक असलेल्या सेवा, साधनांची उपलब्धता, ही समाजाची गरज असते. व्यापाराचे, अर्थकारणाचे ते एक माध्यम असते. समाज कितीही प्रागतिक झाला, विकास झाला तरी, अन्न, वस्त्र, निवारा या बाबींमध्ये फारसा फरक पडत नाही. अन्न, पाणी साठवण्यासाठी, स्वयंपाकासाठी, मुख्यत्वे भांड्यांचा पूर्वापार वापर होत ( Copper Brass Vessel ) आहे. कालांतराने मानवी विकासामध्ये मातीच्या भांड्यांची जागा धातूने घेतली. भांड्यांबरोबर देवादिकांच्या मूर्ती, दागिने, सजावटीच्या वस्तूंसाठी, खेळणी, अवजारे आणि शस्त्रास्त्रांमध्येसुद्धा कणखरता आणि टिकाऊपणासाठी धातूचा वापर होतो. पुण्यातील मूळ कसबा पेठ येथे पेशवे काळापासून राहणारा त्वष्टा कासार समाज ( Tvashta Kasar Community Pune ) गेल्या 400 वर्षांहून अधिक काळापासून आपली कला जोपासत ( Cultivating Art For Over 400 Years ) आहे. नेमकं या समाजाची कला काय आहे. हे जाणून घेऊया..

बनवितात विविध वस्तू : पुण्यातील कसबा पेठ येथे राहणारा हा समाज आजही तांबे, पितळपासून विविध वस्तू बनवत आहे. मोठी तपेली, मोदकपात्र, रोवळी, झारा, किटली, परात, वेळणी, डाव, पळी, चमचा, तसराळे, कातण, किसणी, लाटणे, डबे, ओगराळे, पंचामृत पात्र, ताटवाटी, गडवा, झारी, मनकर्णिका, पंचपात्र, घंगाळं, फुलपात्र इ.वस्तू हे आजही तयार करतात. डेरा घागर, कळशी, अडकित्ता वगैरे, पूजासाहित्यातील उपकरणे देखील या समाजाच्या माध्यमातून बनविले जातात. ही कला आत्ताची नव्हे तर 400 वर्षांहून अधिक काळापासूनची आहे.

४०० वर्षांहून अधिक काळापासून 'हा' समाज पुण्यात घडवतोय तांबे, पितळेची भांडे.. अनोखी आहे कला..

थक्क करणारी कारागिरी : कसबा पेठेतील तांबट हौद परिसरात अजूनही ठाकाठोकीच्या आवाजाचा वेध घेतला तर मन थक्क करणारी कारागिरी प्रत्ययास येते. ‘आगे दुकान (वर्क शॉप) आणि पीछे मकान’ अशी स्थिती आजही काही ठिकाणी पाहायला मिळते. घरांच्या पडव्यांमधून आणि आजूबाजूच्या मोकळ्या जागेत, विविध आकार-प्रकाराचे आणि वजनाचे हातोडे, तांबा-पितळेचे पत्रे ( यांना पाटे म्हणतात ) ठोकून त्यांना गोलाकार बनवण्यासाठी वापरात येणारी लोखंडाची भांडी, तयार वाणावर ठोके मारून पैलू पाडण्यासाठी लागणारी खखय (लाकडाच्या तिकाढव्यात अडकवलेली मोठी ऐरण) यासारखी अवजारे पसरलेली असतात. पेटलेल्या भट्टीमध्ये अड्ड्यांवर (लोखंडी अवजड कडे) तांब्याचा पत्रा ठोकून कोणी वाणाचे बूड बनवीत असते, तर कोणी जोडणीमध्ये मग्न असते. जोडभागावर रसायनांचा लेप देऊन पुन्हा भट्टीत घातला जातो. याला झाळकाम म्हणतात. यानंतर खखयीवर भांडे ठेवून पृष्ठभागावर एकसारखे ठोके मारले जातात. या प्रक्रियेला ‘मटारणी’ म्हणतात. हे पैलू जेवढे प्रमाणबद्ध, तेवढे भांड्यांचे सौंदर्य खुलून दिसते.

४० ते ५० कारखाने : कसबा पेठेत या त्वष्टा कासार समाजाची पहिली 250 हुन अधिक कारखाने होती. त्या त्या कारखान्यात तांब्याच्या आणि पितळच्या धातूंपासून विविध वस्तू तयार केले जात असत. पण काळानुसार त्यात बदल होत गेले. मात्र, या समाजातील लोकांकडून आजही ही कला जोपासली जात आहे. पूर्वी जे 250 हुन अधिक कारखाने चालायचे आज ते फक्त आणि फक्त 40 ते 50 कारखाने चालत आहे. याला कारण ही तसं आहे. बदलत जीवनमान हे याला मुख्य कारण असल्याचं यावेळी येथील मंडळी सांगत आहे.

मोठी तपेली, मोदकपात्र, रोवळी, झारा, किटली, परात, वेळणी, डाव, पळी, चमचा, तसराळे, कातण, किसणी, लाटणे, डबे, ओगराळे, पंचामृत पात्र, ताटवाटी, गडवा, झारी, मनकर्णिका, पंचपात्र, घंगाळं, फुलपात्र इ.वस्तू हे आजही तयार करतात.

या कलेचं पुढे काय होणार : आपली कला पेशवेकालीन, शिवकालीन काळापासून जोपासत आलेला हा समाज अनेक संकट आणि वाढत्या महागाईला आजही तोंड देत आहे. पुढे आमच्या या कलेच काय ? असा सवाल देखील या लोकांना पडलेला आहे. कारण बदलतं जीवनमान आणि त्यात शिक्षणाला वाढलेलं महत्त्व, त्यामुळे येणारी पुढील पिढी आम्ही हात कशाला काळे करायचे हा सवाल करत आहे. पण कला जोपासावी म्हणून येथील मंडळी नवीन पिढीला ही कला शिक्षणाबरोबरच शिकवत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.