पुणे : आजचा विजय भारतीय जनता पक्षाच्या आतापर्यंतच्या विजयातील सर्वात संस्मरणीय विजय आहे. या विजयाला 3 विरुद्ध एक झालर आहे. आडमुठेपणा विरुद्ध समंजस्यापणा अशी झालर आहे. आम्ही घुटणे आहोत, असे म्हणणाऱ्यांना खरचं तुम्ही घुटणे आहात आणि त्यांना बुद्धीचा खेळ हा जमलाच नाही. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी जिंकण महत्त्वाचे होते. आणि ती आम्ही जिंकलो. संजय राऊत यांना सहाव्या नंबरवर जावे लागलं. त्यामुळे एक पडला आणि एक सहाव्या नंबरवर गेला याचा आम्हाला सर्वात मोठा आनंद आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
आम्ही रडीचा डाव केला नाही : पुण्यात कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबाबत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे 106 आमदरांपैकी एकही आमदार हा गैरहजर नव्हता, तर एकही मत हे बाद झालेले नाही. युतीतील 6 आमदार आणि नवीन 11 आमदार यांनी आमच्या उमेदवारांना मतदान केले याचा आम्हाला आनंद आहे. विरोधक जे म्हणत आहे की, रडीचा डाव केला. यावर पाटील म्हणाले की, रडीच्या डावाची व्याख्या बदलली का. जर आम्ही रडीचा डाव केला, तर तुम्ही काय केला, असे यावेळी पाटील म्हणाले.
विधान परिषदेची तयारी झालेली आहे : विधान परिषदेच्या बाबतीत आमची तयारी झाली आहे. 13 तारखेला विड्रोलच्या वेळेस वाट बघू. नाहीतर 5 ऐवजी 6 उमेदवार आम्ही विजयी करणार. राज्यसभेचे मतदान दाखवून द्यायचं होते. पण, विधान परिषदचे मतदान हे दाखवून न देता गुप्त पद्धतीने मतदान असते. त्यामुळे अनेकांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे की, राज्यसभेला नाही मदत केली. पण, विधान परिषदेला करणार, असेदेखील यावेळी पाटील म्हणाले.
आता हे एजन्सी वापरतात त्याचे काय : पूजा चव्हाण प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, प्रत्येक वेळेस केंद्राच्या एजन्सीबाबत बोलतात आणि आता महाराष्ट्राच्या एजन्सी वापरतात त्याच काय, त्यांना जर क्लीन चीट दिली असेल तर त्याला चॅलेंज करणारे अनेक लोक आहेत, असेदेखील यावेळी पाटील म्हणाले.
हेही वाचा : MLC Elections 2022 : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप सहावा उमेदवार रिंगणात उतरवणार?