पुणे - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व व्यवहार थांबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच नागरिकांनीही पुढचे काही दिवस घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचा परिणाम पुण्यातील रस्त्यांवर पहायला मिळत असून सर्वत्र शुकशुकाट आहे.
दरम्यान, शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट आहे. हॉटेल, दुकाने, शाळा, महाविद्यालय, मंदिरं, अशा सर्वच ठिकाणे गर्दीअभावी ओस पडली आहेत.