ETV Bharat / city

Ajit Pawar In Pune : पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवणार - अजित पवार - ajit pawar make pune best city

खराडी येथील ऑक्सिजन पार्कचे भुमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते ( Deputy Cm Ajit Pawar In Pune ) झाले. त्यानंतर बोलताना पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा मानस त्यांना व्यक्त केला ( Pune Best City In State ) आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : Mar 13, 2022, 10:51 PM IST

पुणे - पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा संकल्प ( Pune Best City In State ) आहे. त्यासाठी सर्वांना बरोबर घेत शहरातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त ( Deputy Cm Ajit Pawar In Pune ) केले. खराडी येथे ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुनील टिंगरे उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा आणि लसीकरणाचा प्रयत्न केला. दोन वर्षात आपल्याला ऑक्सिजनचे महत्व लक्षात आले. शासनाच्या प्रयत्नांमुळे राज्य ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. ऑक्सिजन पार्क नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्वाचे ठरेल. या प्रकल्पाला निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

तसेच, या प्रकल्पावर साडेबारा कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. सर्व वयोगटासाठी उपयुक्त ठरावा, अशी याची रचना असणार आहेत. त्यात ओपन थिएटर, जिम, मुलांसाठी अभ्यासिका, सायकल ट्रॅक, बालकांसाठी खेळाची जागा आदी अनेक सुविधा परदेशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. कडुनिंब, अशोका आदी झाडांसह अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने घोषित केलेली सर्वाधिक ऑक्सिजन देणारी झाडे या पार्कमध्ये लावण्यात येणार आहेत. या पार्कसोबत विविध प्रकारची झाडे लावून टेकड्या हिरव्यागार करण्याचा प्रयत्न आहे. शासनाच्या माध्यमातून पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अर्थसंकल्पात पंचसूत्रीच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे, असेही अजित पवार यांनी म्हटलं.

पायाभूत सुविधांच्या विकासाला गती

पुढील ३ वर्षात राज्यात सर्व सुविधांच्या निर्मितीसाठी ४ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पुण्यात सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचार सुविधा असलेली देशातील पहिली मोठी 'मेडिसिटी' वसाहत उभारण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे मेट्रोला दीड हजार कोटी, रिंग रोडच्या भूमी संपादनासाठी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे - नाशिक सेमी- हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर १६ हजार कोटी रूपये खर्च होणार आहे. मेट्रोची कामे करताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्याचे पवार म्हणाले.

रोजगारनिर्मितीवर शासनाचा भर

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार गेले. त्यामुळे मनुष्यबळाला मदत करण्याची, युवकांसाठी इन्क्युबेशन सेंटर, इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याची गरज आहे. रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना आकर्षित करण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे, अशी माहिती सुद्धा पवारांनी दिली.

विकासासाठी सर्वांना सोबत घेणार

पुणे, पिंपरी चिंचवड सह जिल्ह्यात आणि राज्यात शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहे. सर्व जाती धर्माला सोबत घेत विकास साधायचा आहे, अशी शासनाची भूमिका आहे. नागरिकांनी कार्यक्रमांना स्वागतावर खर्च करण्याऐवजी वृक्षारोपण किंवा शाळेला मदत करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे.

हेही वाचा - Transfer Posting Case : देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीची माहिती मुंबई सहआयुक्तांकडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.