ETV Bharat / city

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तीन जण जखमी - तिघे जण जखमी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात ऊपचार सुरू आहेत.

पत्राच्या कठड्याला धडकलेली स्विफ्ट कार
author img

By

Published : Jul 11, 2019, 12:40 PM IST

Updated : Jul 11, 2019, 1:22 PM IST

पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण जखमी झाले आहेत. यात शिरगाव पोलीस चौकी हद्दीतील मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे.

भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पत्र्याच्या कठड्याला जाऊन धडकली. हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात मूनशिर आलम (वय-३४, रा. अंधेरी, मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातात त्याच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तो मुंबईहून पुण्याकडे जात होता. त्यादरम्यान हा अपघात घडला.

याशिवाय इतर दोन अपघात कामशेत बोगद्याजवळ पहाटे चारच्या सुमारास झाले आहेत. यात किलोमीटर क्रमांक ७० आणि ७२ येथे अपघात झाला आहे. भरधाव वेगात असणाऱ्या इर्टीगा गाडीने समोरच्या वाहनाला धडक दिली. यात किरकोळ नुकसान झाले असल्याने वाहन चालक तेथून निघून गेला. तर तिसऱ्या अपघातात होंडा सिटी गाडीने अज्ञात वाहनाला मागच्या बाजूला धडक दिली. यात दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Intro:mh_pun_01_ expressway_accident_10002Body:mh_pun_01_ expressway_accident_10002

Anchor:- मुंबई-पुणे द्रुतगतिमार्गावर झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघात तिघे जण जखमी झाले आहेत. यात शिरगाव पोलीस चौकी हद्दीत मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या स्विफ्ट कार च्या भीषण अपघात चालक गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगात असलेली स्विफ्ट कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट पत्र्याच्या कठड्याला जाऊन धडकली, यात गाडीचे मोठे नसून झाले असून मूनशिर आलम वय-३४ रा. अंधेरी मुंबई हा गंभीर जखमी झाला आहे. गाडीत तो एकटाच असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. तो मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होता. हा अपघात सकाळी सात च्या सुमारास झाला. तर इतर दोन अपघात कामशेत बोगद्याजवळ पहाटे चार च्या सुमारास झाले आहेत. यात किलोमीटर क्रमांक ७० आणि ७२ येथे अपघात झाला. भरधाव वेगात असणाऱ्या इर्टीगा गाडीने समोरच्या वाहनाला धडक दिली यात किरकोळ नुकसान झाले असल्याने ते निघून गेले. तर तिसऱ्या अपघातात होंडा सिटी गाडीने अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली यात दोघे जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. Conclusion:
Last Updated : Jul 11, 2019, 1:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.