ETV Bharat / city

Baramati Murder Case पोराला सोडले अन् बापालाच कापले, तीन अल्पवयीन अटकेत

author img

By

Published : Aug 19, 2022, 9:50 PM IST

बारामती शहरातील श्रीरामनगर येथे गुरुवारी दि. 18 ऑगस्ट रोजी एका 47 वर्षीय इसमावर तिघांनी कुऱ्हाड व लोखंडी सत्तूराने घाव घालत निघृण खून केल्याची धक्कादायक घटना minors killed person in Baramati घडली. झालेल्या हल्ल्यात शशिकांत बाबासो कारंडे dead Shashikant Karande from Baramati वय 47 वर्षे राहणार भिगवन रोड बारामती मूळ राहणार मठाचीवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.

Baramati Murder Case
बारामती हत्याकांडातील तीन अल्पवयीनांना अटक

बारामती बारामती शहरातील श्रीरामनगर येथे गुरुवारी दि. 18 ऑगस्ट रोजी एका 47 वर्षीय इसमावर तिघांनी कुऱ्हाड व लोखंडी सत्तूराने घाव घालत निघृण खून केल्याची धक्कादायक घटना minors killed person in Baramati घडली. झालेल्या हल्ल्यात शशिकांत बाबासो कारंडे dead Shashikant Karande from Baramati वय 47 वर्षे राहणार भिगवन रोड बारामती मूळ राहणार मठाचीवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. Baramati police arrested minors in murder case

खूनाचे आरोपी अवघ्या काही तासात जेरबंद गुरुवारी सायंकाळी मुलीला आणण्यासाठी गेलेल्या शशिकांत कारंडे यांच्यावर कुऱ्हाड व सत्तूराने तिघांनी वार करत त्यांचा खून केला होता. भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर बारामतीत खळबळ उडाली होती. अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती. पोलिसांनी काही तासातच आरोपींना ताब्यात घेतले.

लेकीन कब्रस्थान उनको जरूर बनाएंगे .. खून झालेल्या शशिकांत यांच्या मुलाशी यापूर्वी यातील एका आरोपीशी भांडण झाले होते. त्यात कारंडे यांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी त्यावेळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. मुलीशी बोलणे व चॅटींग करण्याच्या कारणावरून हा वाद झाला होता. प्रेमामध्ये तो अडथळा आणतो. असा समज आरोपींचा झाला होता. त्यातून त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला होता. पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. परंतु ते अल्पवयीन असल्याने जामिनावर सुटले. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी खून प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीने कारंडे यांच्या मुलाला उद्देशून आबाद रहे ना रहे लेकीन कब्रस्थान उनको जरूर बनाएंगे फिक्स बिग शाॅट.. असे स्टेटसही ठेवले होते. खून झालेल्या शशिकांत यांनी ते स्टेटस पाहून आपल्या मुलाला सावध केले होते. तो इंजिनिअरिंग काॅलेजमध्ये शिकतो. मागील प्रकरणानंतर त्याने या अल्पवयीनांशी संबंध ठेवणे बंद केले होते.

वडिलकीचा सल्लाही ठरला व्यर्थ शशिकांत यांनी जुने घर बदलत नवीन ठिकाणी राहायला जाणे पसंत केले होते. शिवाय भांडणे करू नका, असा वडिलकीचा सल्ला शशिकांत यांनी दिला होता. मुलगा हाती येत नसल्याने त्याच्या ऐवजी त्याच्या वडिलांचा काटा या अल्पवयीनांनी काढला. १८ ऑगस्ट रोजी ती कवी मोरोपंत शाळेत गेली होती. तिला आणण्यासाठी वडील शशिकांत हे गेले होते. यावेळी त्या परिसरात दबा धरून बसलेल्या तिघांनी कुऱ्हाड व सत्तूराने त्यांच्यावर वार केले होते. त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाण्याचा शशिकांत यांनी प्रयत्न केला. परंतु त्यांचा पाठलाग करत त्यांना मारण्यात आले.

हेही वाचा Nirbhaya Like Scandal In Hamirpur मुलीला निर्वस्र करून निर्दयीपणे मारहाण करणारे पाच आरोपी अटकेत, पीडित मुलीचा शोध सुरूच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.