ETV Bharat / city

डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

author img

By

Published : Jul 30, 2021, 6:12 PM IST

Updated : Jul 30, 2021, 6:46 PM IST

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यावर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

डॉ. सायरस पूनावाला
डॉ. सायरस पूनावाला

पुणे - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यावर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाणार आहे. पूनावाला समूहाच्या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या कोव्हिशील्ड लशीने भारतासह जगभरातील कोट्यवधी नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवले. विविध प्रकारच्या लसनिर्मितीमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘सीरम’ने जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या रक्षणार्थ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या तत्त्वासाठी डॉ. पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली पूनावाला समूहाच्या या कंपनीने मोठी झेप घेतली. ते अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी डॉ. सायरस पूनावाला यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी पुरस्काराची घोषणा केली

स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप
13 ऑगस्ट रोजी होणार्‍या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे. त्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता टिळक महाराष्ट्र विद्यापीठात हा सोहळा होणार आहे. दरवर्षी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनी दि. 1 ऑगस्ट रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात होणार्‍या विशेष समारंभात पुरस्काराचे वितरण होते. यंदाचा समारंभ 13 ऑगस्ट रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

पुरस्काराचे यंदाचे 38वे वर्ष
पुरस्काराचे यंदाचे 38वे वर्ष आहे. 1983 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यापूर्वी एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन, बाबा कल्याणी यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या वर्षी पुरस्कारासाठी सोनम वांगचुक यांची निवड करण्यात आली.

‘सीरम’च्या कार्यक्षमतेमागे, सक्षम वाटचालीमागे डॉ. सायरस पूनावाला यांचे द्रष्टे नेतृत्व
कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला. लाखो व्यक्तींचे बळी गेले. कोरोनावर लशीची निर्मिती हाच संकटातून वाचण्याचा मार्ग होता. ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेन्काच्या सहकार्याने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अत्यंत कमी कालावधीत कोव्हिशील्डच्या कोट्यवधी डोसचे केलेले उत्पादन संपूर्ण मानवजातीसाठी वरदान ठरले आहे. भारतानेे कोव्हिशील्ड लस अन्य देशांनाही पुरवली. ‘सीरम’च्या कार्यक्षमतेमागे, सक्षम वाटचालीच्या मागे डॉ. सायरस पूनावाला यांचे द्रष्टे नेतृत्व आहे. सर्वांसाठी आरोग्याचे ध्येय ठेवून डॉ. पूनावाला यांनी ‘सीरम’द्वारे प्रारंभापासूनच परवडणार्‍या दरातील लशींची निर्मिती केली. यामध्ये त्यांनी गुणवत्तेशी कधीही तडजोड होऊ दिली नाही. यातूनच आज लस निर्मितीच्या क्षेत्रात ‘सीरम’ इन्स्टिट्यूट जगात अग्रस्थानी आहे, असे डॉ. टिळक यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा - 'ही' तर प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा, उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला सुनावले

Last Updated : Jul 30, 2021, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.