पुणे - राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर दीड महिना उलटला असला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही म्हणून विरोधकांकडून टिका होत होती पण मागच्याच आठवड्यात शिंदे सरकारकडून 18 आमदारांचा शपथविधी पार पडला पण अजूनही खाते वाटप झालेले नाही यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा एक आवडता आणि पॉप्युलर शब्द झाला आहे तो म्हणजे लवकरात लवकर खर तर त्यांनी खूपच लवकर खातेवाटप केल पाहिजे अस अजित पवार म्हणाले आहेत 17 तारखेला अधिवेशन आहे आणि अधिवेशनामध्ये प्रश्न विचारले जातात पण नेमके काय कारण आहे हे त्या दोघांनाच माहीत आहे असे यावेळी पवार म्हणाले
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बारामती येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे तीन दिवसीय दौऱ्यावर येणार आहे याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की बारामती तालुक्याचे आमदार म्हणून निर्मला सीतारामन यांचे मी स्वागत करतो बारामतीमध्ये आम्ही काय केले आहे ते पहाण्यासाठी याआधी पंतप्रधान आले राष्ट्रपती आले आणि आत्ता निर्मला सीतारामन या देखील येत आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांचे स्वागत आहे जर त्यांना बारामतीची जबाबदारी दिली आहे तर ठीक आहे उद्या मी पण वाराणसी ची जबाबदारी घेईल पण जबाबदारी घेणाऱ्याला देखील कळाल पाहिजे की खरोखरच आपण तिथं जाऊन काही करू शकतो का आपण आपला वेळ वाया घालवायचा का हे त्यांनी विचार करावा अस यावेळी पवार म्हणाले
जनतेला हे फोडफाडीचा राजकारण पटलेले नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की जर माहविकास आघाडी सरकार असते तर मी शहीद झालो असतो यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले कोणी शहीद झाले असते कोणी नाही काय झाले असते मी काय सांगणार ते राजकीय शहीद झाले असते की खरोखरच शहीद झाले असते हे शहीद च अर्थ काय काढायचा पण मी एक सांगणार की राज्याच्या जनतेला हे फोडफाडीचा राजकारण पटलेले नाही अस देखील पवार यावेळी म्हणाले
शैक्षणिक कर्जात वाढ करण्याचा निर्णय आजच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) संचालक बोर्डाच्या बैठकीत शैक्षणिक कर्जात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत पवार म्हणाले की देशात महागाई खूप वाढत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत पालकांना आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने शैक्षणिक कर्जात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आता देशांतर्गत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ३० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे
विद्यार्थ्यांना फायदा होणार आता देशांतर्गत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ३० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे याआधी हे कर्ज १५ लाख रुपये होते तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्यासाठी ४० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे याआधी हे कर्ज २५ लाखांपर्यंत मिळत होते शिवाय गृह कर्जात देखील वाढ करण्यात आली असून बोर्डाकडून शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय बोर्डाने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे
हेही वाचा Photo Gallery स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वावर झगमगली अमरावती