ETV Bharat / city

कौतुकास्पद : 'मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट'तर्फे गरजूंना धान्य वाटप

author img

By

Published : Apr 4, 2020, 4:55 PM IST

तृतीयपंथी म्हटले की कायम घेणारे हात, असा सर्वसामान्य समज आहे. मात्र, जागतिक महामारीच्या या संकटात तृतीयपंथीयांनी आपले सामाजिक भान जपत, दातृत्वाची जाणीव ठेऊन लॉकडाऊनमुळे घरादारापासून परागंदा झालेल्या नागरिकांसाठी अन्नपाण्याची व्यवस्था केली आहे.

Mangalamukhi kinner Charitable Trust
'मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट'तर्फे पुणे शहरात गरजूंना धान्य वाटप

पुणे - 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' याचा अर्थ देणाऱ्यांचे दातृत्व घेणाऱ्या हातांकडे आले पाहिजे. घेणाऱ्या हातांनी कधीतरी देणारेही झाले पाहिजे. याचा प्रत्यय पुण्यामध्ये पहायला मिळाला आहे. तृतीयपंथी म्हटले की कायम घेणारे हात, असा सर्वसामान्य समज आहे. मात्र, जागतिक महामारीच्या या संकटात तृतीयपंथीयांनी आपले सामाजिक भान जपत, दातृत्वाची जाणीव ठेऊन लॉकडाऊनमुळे घरादारापासून परागंदा झालेल्या नागरिकांसाठी अन्नपाण्याची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा... नरेंद्र मोदींचा टाळी, थाळी आणि दिवाळी कार्यक्रम दुर्दैवी, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

पुण्यातील मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष रंजीता नायक यांच्या मार्गदर्शनानुसार पुणे शहरातील विविध भागात राहणाऱ्या गोरगरीब तसेच लॉकडाऊनच्या दरम्यान हातावर पोट असणाऱ्या नागरिकांसाठी गेल्या सात दिवसापासून अन्नधान्य वाटप होत आहे. तसेच पुढील काळातही अशाच पद्धतीने मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या कार्याध्यक्षा मनीषा पुणेकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.