ETV Bharat / city

Pune Police नवी पांढऱ्या रंगाच्या गाड्या चोरण्याचा चोराचा अनोखा छंद, पोलिसांनी ठोकल्या बेड्या - चतुश्रृंगी पोलिसांनी केली चोराला अटक

वेगळा छंद असलेल्या चोराला पोलिसांनी पकडले आहे. या चोराला पांढऱ्या मोपेड गाड्या चोरी thief white colored moped करण्याचा छंद लागला होता. या चोराने ७ पांढऱ्या मोपेड गाड्या चोरी केल्या होत्या. अखेर चतुश्रृंगी पोलिसांनी Pune Police त्याला बेड्या ठोकल्या आहेत. विवेक वाल्मीक गायकवाड वय २० रा. थेरगांव असे अटक केलेल्य चोराचे नाव आहे.

चोरीच्या गाड्या
चोरीच्या गाड्या
author img

By

Published : Aug 17, 2022, 5:24 PM IST

Updated : Aug 17, 2022, 6:49 PM IST

पुणे - आजकाल कुणाला काय छंद लागलेले असेल याबाबत काहीच सांगता येत नाही. त्यात जर एखादा चोर असेल तर त्याचे चोरीचे छंद हे तर खूपच निराळे असतात. असाच वेगळा छंद असलेल्या चोराला पोलिसांनी पकडले आहे. या चोराला पांढऱ्या मोपेड गाड्या चोरी thief white colored moped करण्याचा छंद लागला होता. या चोराने ७ पांढऱ्या मोपेड गाड्या चोरी केल्या होत्या. अखेर चतुश्रृंगी पोलिसांनी Pune Police त्याला बेड्या ठोकल्या आहेत. विवेक वाल्मीक गायकवाड वय २० रा. थेरगांव असे अटक केलेल्य चोराचे नाव आहे.

विवेक हा मूळचा उस्मानाबाद जिल्हात राहणार आहे. तो काही दिवसांपूर्वी पुण्यात आला होता. तो कोणताही काम करत नव्हता. पण त्याला नवीन गाड्या फिरवण्याचा छंद होता. त्याही नवीन पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाड्या. म्हणून तो पार्किंगमधून नवीन गाड्या चोरायचा. चोरीची गाडी फिरवायचा आणि त्या गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर गाडी त्याच ठिकाणी सोडून पसार व्हायचा. विशेष म्हणजे विवेक हा गाडी चोरल्यावर आणि त्यांनतर ती फिरवल्यावर तो गाडी विकत नव्हता.

प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक

विवेक याने चतु:श्रृंगी, वाकड, सांगवी या भागातून या दुचाकी चोरी केल्या होत्या. पोलिसानी चोराच्या शोधत विविध भागात थेट पार्किंगमध्ये ट्रॅप लावला. एका सोसायटीत पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मुळे व किशोर दुशिंग यांनी एका पार्किंगमध्ये थांबलेले असतानाच विवेक हा नव्या गाड्यांना चाव्या लावून पाहत असल्याचे दिसले. तत्काळ पोलिसानी त्यांच्या मुसक्या आवळ्या आणि त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे ७ गाड्या चोरल्याच निष्पन्न झाले.

हेही वाचा -Accused Arrested खार गोळीबार प्रकरणी एकास अटक खंडणी उकळण्याचा होता उद्देश

Last Updated : Aug 17, 2022, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.