पुणे - शहरात आठवीमध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलीची कोयत्याने मानेवर वार करून निर्घून हत्या केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 12 ऑक्टोबर)रोजी संध्याकाळी बिबवेवाडी मधील यश लॉन्स परिसरामध्ये घडली आहे. दरम्यान, यातील मारेकऱ्यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. या घटनेतील मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी असलेल्या ऋषिकेश भागवत याला आज पहाटे पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत.
तिघांना पोलिसांनी अटक केली
घटनास्थळाशेजारच्या असलेल्या झुडपात मुख्य आरोपी हा रात्रभर लपून बसला होता अशी माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांची शोधमोहीम सुरु असताना ऋषिकेश भागवत हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पुण्याचे सीपी अमिताभ गुप्ता यांनी घटना स्थळाची पाहणी करून गुन्ह्याची सर्व माहिती घेतली आहे. अल्पवयीन मुलीचा खून करुन पळून गेलेल्या चार संशयित आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असल्याचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले आहे.
तिच्या गळ्यावर कोयत्याने वार केले
शुभम भागवत हा मुलीचा नातेवाईक आहे. तो सुखसागरनगरला मावशीकडे राहून काही कामे करत होता. तो या मुलीला गेल्या दीड वर्षांपासून त्रास देत होता. दरम्यान, ही गोष्ट मुलीच्या पालकांना समजल्यावर त्यांनी शुभम याला समज दिली होती. त्यानंतर तो चिंचवडला रहायला गेला होता. त्यानंतर काल सायंकाळी तो दोन मित्रांना घेऊन यश लॉन्स येथील मैदानावर आला. त्याने मुलीला बाजूला बोलावले. त्यानंतर तीने तू येथे काल आलास असे विचारल्यावर त्यांच्यात वाद झाला. तेव्हा त्याच्या साथीदाराने तिच्या पायावर वार केला. शुभम याने तिच्या गळ्यावर कोयत्याने वार केला. त्यामध्ये ती मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली. दरम्यान, तिच्या मैत्रिणी धावत तेथे आल्यावर ते हातातील हत्यारे तेथेच टाकून पळून गेले.
हेही वाचा - धक्कादायक : कब्बडी खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मानेवर कोयत्याने वारकरून केली निर्घृण हत्या